Priyanka Chopra : प्रियांकाचा मन्नाराला सपोर्ट; बिग बॉस १७ च्या ग्रॅड फिनालेच्या आधीच खास संदेश | पुढारी

Priyanka Chopra : प्रियांकाचा मन्नाराला सपोर्ट; बिग बॉस १७ च्या ग्रॅड फिनालेच्या आधीच खास संदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १७’ सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. चार दिवसांनंतर ‘बिग बॉस’ १७ व्या सीझनमधील विजेत्याचे नाव समोर येणार आहे. दरम्यान या घरात ग्रॅड फिनालेमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, अरुण मशेट्टी, मन्नारा चोप्रा आणि अभिषेक कुमार हे पाच स्पर्धक पोहोचले आहेत. यातून एक जण विजेता घोषित होणार असून त्याला यंदाची ‘बिग बॉस १७’ ची ट्राफी मिळणार आहे. दरम्यान आता बॉलिवूड, हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने ( Priyanka Chopra ) मन्नाराला सपोर्ट केला आहे.

संबंधित बातम्या 

वास्तविक, ‘बिग बॉस१७’ च्या ग्रॅड फिनालेला फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. आधीच मन्नाराची बहीण आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा ( Priyanka Chopra ) तिला सपोर्ट करण्यासाठी सरसावली आहे. यादरम्यान तिने सोशल मीडियावर मन्नाराचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘तु प्रामाणिकपणे सर्वोत्तम दे आणि यावेळेस इतर गोष्टी दुर्लक्ष कर. तर काही गोष्टी विसरून जा.’

या पोस्टवरून प्रियांका मन्नाराला खूपच आणि प्रामाणिक प्रयत्न कर यश मिळेल असे म्हणत तिला सपोर्ट करताना दिसत आहे. यापूर्वीही प्रियांकाची आई मधु चोप्राने मन्नारासाठी खास पोस्ट करत तिला भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या.

अभिनेता विकी जैन काल बिग बॉस १७ मधून काल बाद झाला. यानंतर अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, अरुण मशेट्टी, मन्नारा चोप्रा आणि अभिषेक कुमार हे पाच स्पर्धक टॉप-५ मध्ये पोहोचले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक कुमार, मुनावर फारुकी आणि मन्नारा चोप्रा हे तीन स्पर्धक टॉप-३ मध्ये पोहोचतील असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तर २८ जानेवारीच्या मध्यरात्री १२ पर्यंत वोटींग लाईन खुल्या ठेवल्या आहेत. यामुळे चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला वोट करू शकतात.

Back to top button