पुढारी ऑनलाईन डेस्क : आम्हाला अयोध्येत हॉटेल्स उभारण्यासाठी 25 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यामध्ये शाकाहारी सेव्हन स्टार हॉटेल बांधण्याचाही प्रस्ताव आहे, असे स्पष्ट करत अयोध्या हे लवकरच जागतिक दर्जाच्या सुविधांसह धार्मिक पर्यटनाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. (Ayodhya seven star 'only vegetarian' hotel )
एका कार्यक्रमात बाेलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी होणार आहे. सध्या धार्मिक नगरीमध्ये 50 हजारांहून अधिक भाविक राहण्याची क्षमता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी, गोरखपूर, आदित्यनाथ यांना गृहनगर, लखनौ आणि प्रयागराज यांना जोडण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर विकसित केला जाईल, (Ayodhya seven star 'only vegetarian' hotel )
२०१७ पूर्वी अयोध्येत कोणत्याही पायाभूत सुविधा नव्हत्या. आम्ही गेल्या काही वर्षांत शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला, हे सर्व दहा वर्षांपूर्वी व्हायला हवे होते, परंतु अयोध्येत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शहराच्या विस्तारात जे लोक विस्थापित झाले किंवा त्यांची दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठान पाडण्यात आले, त्यांना पुरेशी भरपाई देण्यात आली आणि दुकानांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.
हेही वाचा :