Ayodhya Ram Mandir Inauguration
Ayodhya Ram Mandir Inauguration

Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिरातील आरतीत सहभागी व्हायचेय? अशी करा बुकिंग

Published on

अयोध्येतील राम मंदिरातील आरतीत तुम्हाला सहभागी व्हायचेय? मग, घरी बसून तुम्ही त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करू शकता. त्यासाठी आपण ५ स्टेप्सच्या मदतीने ऑनलाईन बुकिंग करू शकाल. पासशिवाय तुम्हाला आरतीत प्रवेश मिळणार नाही. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा आहे. पुढे मंदिरात दररोज आरती होईल. तुम्ही मंदिराच्या काऊंटरवरून ऑफलाईन पासही घेऊ शकता; पण संभाव्य गर्दीमुळे तुम्हाला तत्पूर्वीच बुकिंग करायचे असेल, तर ऑनलाईन पास बूक करण्याची सुविधा सुरू झालेली आहे.

संबंधित बातम्या : 

३ वेळा आरती, ३० जणांना प्रवेश

  • पहिली आरती स. ६.३० वा.
  • दुसरी आरती दु. १२ वा.
  • तिसरी आरती सायं. ७.३० वा.
  • आरतीच्या एका स्लॉटमध्ये केवळ ३० जणांना प्रवेश मिळेल.

अशी करा बुकिंग

  • राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या srjbtkshetra.org या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • होमपेजवरून उपलब्ध आरती सेक्शन सिलेक्ट करा.
  • नाव, फोटो, पत्ता आणि आपल्या मोबाईल फोन नंबरसह आवश्यक डिटेल्स भरा.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news