Gabba Pitch : दोन दिवसांत 34 बळी घेणा-या गाबा खेळपट्टीवर आयसीसीची कारवाई

Gabba Pitch : दोन दिवसांत 34 बळी घेणा-या गाबा खेळपट्टीवर आयसीसीची कारवाई
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Gabba Pitch : ब्रिस्बेनच्या गाबा खेळपट्टीवरून ऑस्ट्रेलिया अडचणीत सापडला आहे. नुकताच द. आफ्रिके विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीचा निकाल अवघ्या दोन दिवसांत लागल्याने आयसीसीने कांगारूंच्या क्रिकेट बोर्डाला फटकारले असून गाबा खेळपट्टीला सरासरी पेक्षा कमी असल्याचे निर्णय दिला आहे.

ब्रिसबेन कसोटीच्या दोन दिवसाच्या खेळात 34 विकेट पडल्या. सामन्याचा निकाल 145 षटकात लागला. ऑस्ट्रेलियाने हा सामना सहाव्या सत्रात सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पण त्यांच्या विजयापेक्षा गाबाच्या खेळपट्टीचीच अधिक चर्चा रंगली. द. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरसह अनेक दिग्गज खेळाडूंनी उघडपणे या खेळपट्टीवरून नाराजी व्यक्त केली आहे. पाच दिवसांच्या कसोटीचा निकाल अवघ्या दोन दिवसांत लागणे हे ऑस्ट्रेलिया वगळता इतर कोणत्याच क्रिकेट चाहत्यांला आवडलेले नाही. गाबाच्या या खेळपट्टीवर द. आफ्रिकेशिवाय सेना (SENA) देशांतील इतर कोणत्याही संघाने आक्षेप घेतला नसला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या प्रकरणी कसून चौकशी करत या खेळपट्टीला 'सरासरीपेक्षा कमी' असे रेटिंग दिले आहे.

आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी गाबा खेळपट्टीवर आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. ही खेळपट्टी 'सरासरीपेक्षा कमी' असल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे. अहवालात म्हटलंय की, गाबाची ही खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांच्या बाजूने होती. त्यावर भरपूर उसळी होती आणि काही प्रसंगी चेंडू आवश्यकतेपेक्षा जास्त सीम होत होता. खेळाच्या दुसऱ्या दिवशी चेंडूला लो बाउन्स मिळला. फलंदाजांना खेळणे कठीण झाले. आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मी या खेळपट्टीला 'सरासरीपेक्षा कमी' असे रेटींग देतो. या खेळपट्टीवर बॅट आणि बॉलमध्ये बरोबरीचा सामना झाला नाही, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

'ब्रिस्बेन'चे भविष्य धोक्यात!

द. आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 152 आणि दुसऱ्या डावात केवळ 99 धावांवर संपुष्टात आला होता. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 218 धावा केल्या आणि दुस-या डावात विजयासाठी आवश्यक असणा-या 34 धावांचा पाठलाग करताना चार विकेट गमावून 35 धावा केल्या. या सामन्यात द. आफ्रिकेचा संघ दोनदा ऑलआऊट झाला, तर ऑस्ट्रेलियन संघाने 14 विकेट गमावल्या. त्यामुळे गोलंदाजांच्या बाजूने झुकणा-या या खेळपट्टीला डिमेरिट गुण देण्यात आला असून पुढील पाच वर्षे तो सक्रिय राहील. या कालावधीदरम्यान, डिमेरिट गुणांची संख्या पाचवर पोहोचल्यास, हे ठिकाण 12 महिन्यांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news