पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅलिस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने इस्राईलवर ५ हजार रॉकेट डागले, यात २२ इस्राईली नागरिकांचा मृत्यू झाला असून एकूण ५४५ नागरिक जखमी झालेले आहेत. हमासने केलेल्या इतक्या मोठ्या हल्ल्याची माहिती इस्राईलच्या गुप्तहेर संघटनेला कशी होऊ शकली नाही, याची चौकशी करण्याचे आदेश इस्राईलने दिले आहेत. दरम्यान इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी हे युद्ध असल्याचे जाहीर केले आहे. (Israel-Palestine escalation)
बीबीसीने दिलेल्या वृत्तात इस्राईलमध्ये मृतांची संख्या २२ झाली असल्याचे म्हटले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली आहे. दरम्यान पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महामौद अब्बास यांनी तातडीची बैठक बोलवली, त्यांनी पॅलेस्टाईनमधील नागरिकांना आणि स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, असे म्हटले आहे. दरम्यान अल जझिरा या वृत्तवाहिनीने गाझाच्या हॉस्पिटलमध्ये मृतदेहांचा खच पडल्याचे म्हटले आहे.
बीबीसीचे आंतरराष्ट्रीय संपादक जेरेमी ब्रावेन यांनी हमासने युद्ध पुकारल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात, "गाझा पट्टीतील स्थिती आधीच चिंताजनक आहे. आज जो हल्ला झाला त्याची कोणीही कल्पना केली नव्हती." हमासने ५००० रॉकेट डागल्यानंतर किमान १२ दहशतवादी दक्षिण इस्राईलमध्ये पोहोचले होते. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इस्राईलला पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान तुर्की आणि इजिप्त या दोन राष्ट्रांनी इस्राईल आणि पॅलेस्टाईनला संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
इस्रालईचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हे युद्ध असल्याची घोषणा केली आहे. हमासला याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असे नेत्यन्याहू यांनी म्हटले आहे. इस्राईलने हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून लष्करी मोहीम सुरू केली असून त्याला Operation Iron Swords असे नाव दिले आहे.
हमासचे 'Al Aqsa Flood' | Israel at War against Hamas
हमासने या कारवाईला अल अक्सा फ्लड (Al Aqsa Flood) असे नाव दिले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झाल्यानंतरची आताची जगातील सर्वांत मोठी भूसामरिक घटना म्हणून याकडे पाहिले जात आहे. इस्राईलने त्यांच्या भूमीवर मोठ्या प्रमाणावर दहशतावाद्यांनी घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. गाझा पट्टीतून दहशतवादी इस्राईलमध्ये घुसले आहेत, त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे इस्राईलच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे.
हेही वाचा