चंद्रपूर : अंगणात बसलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; महिला जागीच ठार

चंद्रपूर : अंगणात बसलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; महिला जागीच ठार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर येथे स्वत: च्या घरासमोरील अंगणात बसलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला जागीच ठार केले. ही घटना काल रविवारी (१ मे २०२२) रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतील मृत्त महिलेचे नाव गिता मेश्राम असे आहे. मागील दोन महिन्यांपासून या परिसरात बिबट हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पंधरा दिवसांपूर्वी या परिसरातून एक बिबट्याला वनविभागाने जेरबंद करण्यात आला होते. त्यानंतर पुन्हा आणखी एक घटना घडली.

याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, दुर्गापूर वार्ड क्रमांक ३ येथील गीता मेश्राम ही महिला काल रविवारी रात्रीचे जेवण आटोपून अंगणात बसली होती. रात्री १२.०० वाजण्याच्या सुमारास दुर्गापूर परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने घराच्या अंगणात प्रवेश केला. आणि सदर महिलेवर हल्ला केला. महिलेने यावेळी जोरजोरात आरडाओरडा केल्याने घरातील कुटुंबिय धावत बाहेर आले. आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र, गीता गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने एका छोट्या मुलास आणि घराशेजारी उभा असलेल्या तरूणाला उचलून नेले होते. याच्याआधी महाऔष्णिक विज केंद्रातून एकजण कारने घरी परतत असताना त्यावर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले होते. आतापर्यंत घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील नागरिकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news