Assembly Election Results 2023 | आगामी लोकसभा निवडणुकीत ‘INDIA’ आघाडीचे ‘पानिपत’ हाेईल : एकनाथ शिंदे

Assembly Election Results 2023 :Eknath shinde
Assembly Election Results 2023 :Eknath shinde

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेची सेमीफायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभांपैकी ४ राज्यांचे कौल आज (दि. 3 डिसेंबर) स्पष्ट झाले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप निर्णायक आघाडी घेत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या राज्यातील भाजपच्या विजयावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाच्या आघाडीचे 'INDIA' आघाडीचे 'पानिपत' होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या संदर्भातील पोस्ट मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवर (सध्याचे 'X') केली आहे. (Assembly Election Results 2023)

मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेले 'काम' आणि अमित शहा यांचे योग्य 'नियोजन' यामुळेच चारपैकी तीन राज्यांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठे यश मिळाले आहे. 'घर घर मोदी, मन मन मोदी' हे चित्र या निकालातून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी विरोधी आघाडीतील काही लोक मोदींचा करिश्मा ओसरला असं म्हणत होते; पण जनतेने पुन्हा मोदींनाच साथ दिली, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. (Assembly Election Results 2023)

२०२४ मध्ये पुन्हा पीएम मोदीच : एकनाथ शिंदे

२०१४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान विरोधकांनी पीएम मोदींवर टीका केली तरीही ते निवडून आले. २०१९ च्या लोकसभांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत 'चौकीदार चोर है' म्हणत आरोप केले; पण मोदीजी पुन्हा निवडून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील सर्व विरोधक एकत्र येत, मोदींना विरोध करत आहेत. आता देखील ते यामध्ये यशस्वी होणार नसून, पीएम मोदी पुन्हा निवडून येतील आणि इंडिया अलायन्सचे पानिपत झालेले दिसेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवरून केलेल्या पोस्टमध्ये म्‍हटले आहे. (Assembly Election Results 2023)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news