पुढारी ऑनलाईन डेस्क : आसामच्या (Assam) जोरहाट जिल्ह्यातील एका बाजारपेठेत गुरुवारी (दि.१६) रात्री उशिरा भीषण आग लागली. हि आग इतकी भीषण होती की, बाजारपेठेतील तब्बल १५० दुकाने जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या पंचवीस गाड्या आग विझवत आहेत. आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. असे पोलिसांनी सांगितले. वाचा सविस्तर बातमी.
पोलिसांच्य माहितीनूसार, आसाममधील जोरहट शहराच्या मध्यभागी असलेल्या चौक बाजार येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास आग लागली. दुकानातील इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय असून, गर्दीच्या बाजारपेठेत ही आग वेगाने पसरली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारण सर्व दुकाने बंद होती आणि मालक आणि कर्मचारी त्यांच्या घरी निघून गेले होते. दुकानातील साहीत्य जळून खाक झाली आहेत. टिटाबोर आणि मारियानी या जवळच्या शहरांमधून आणि गोलाघाट जिल्ह्यातून विध्वंसक आग विझवण्यासाठी अतिरिक्त अग्निशमन दल आणण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या पंचवीस गाड्या आग विझवत आहेत. अद्याप आटोक्यात आलेली नाही. अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचणे कठीण जात आहे.
आग विझवल्यानंतरच कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज येईल, असे पोलिसांनी सांगितले. जोरहाटमध्ये दोन महिन्यांत आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. डिसेंबरमध्ये लागलेल्या भीषण आगीत मारवाडी पॅटी परिसरातील अनेक दुकाने जळून खाक झाली होती.
हेही वाचा