पुढारी ऑनलाईन डेस्क: एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची लूट सुरूच आहेत. आज पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी करत पदकांचा दबदबा कायम ठेवला आहे. चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये सोलैराज धर्मराजने लांब उडीत देशाला २५ वे सुवर्ण पदक मिळवून दिले. एशियन पॅरा गेम्समधील भारताचे हे २५ वे सुवर्णपदक आहे. (Asian Para Games)
पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या लांब उडी T64 प्रकारात सोलैराज धर्मराजने ६.८0 अशी सर्वोत्कृष्ट लांब उडी घेत, सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच सोलैराज धर्मराज या पॅरा – अॅथलीटने ६.८0 अशी उडी घेऊन नवीन आशियाई आणि पॅरा गेम्समध्ये नवीन विक्रम रचला आहे. दरम्यान भारत पॅरा गेम्स, २०२३ मध्ये पदकांची शतकपूर्ती करण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. सोलैराज धर्मराजने लांब उडीत मिळवलेले सुवर्ण हे भारताचे ९८ वे पदक आहे. (Asian Para Games)
आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी सुरू आहे. त्यामुळे भारताच्या वाढत्या पदकतालिकेत भर पडत आहे. आतापर्यंत भारताने एकूण ९८ पदके मिळवली आहेत. भारत लवकरच पॅरा गेम्समधील १०० पदकांचा टप्पा पार करणार आहे. भारत या नवीन विक्रमाच्या अगदी जवळ आहे.