पुढारी ऑनलाईन : आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची घौडदोड सुरु आहे. आज कंपाऊंड ओपन मिश्र टीमने तिरंदाजीत भारताला पहिले सुवर्ण जिंकून दिले. अंतिम फेरीत भारताच्या राकेश कुमार आणि शीतल देवी यांनी चीनच्या जोडीचा १५१-१४९ असा पराभव करत बाजी मारली. पॅरा गेम्समध्ये याआधी शीतल देवीने महिला दुहेरी कंपाऊंड इव्हेंटमध्ये रौप्यपदक जिंकले होते. आज तिने मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
संबंधित बातम्या
हात अथवा पाय नसले तरी स्वप्नांना पंख असतात. टीम इंडियातील १६ वर्षीय तिरंदाज शीतल देवी ही जुलैमध्ये पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली हात नसलेली महिला बनली होती. तिने आता हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्समध्ये तिच्या सहकाऱ्यासह महिला दुहेरी कंपाऊंडमध्ये रौप्यपदक जिंकले. याबाबत हांगझोऊ चौथ्या आशियाई पॅरा गेम्सने त्यांच्या अधिकृत X हँडलवर पोस्ट करत तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच शीतल देवी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
सध्या चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या पॅरा गेम्समध्ये भारताची अतुलनीय कामगिरी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे. "जकार्ता २०१८ आशियाई पॅरा गेम्समधील आमचा मागील ७२ पदकांचा विक्रम मोडून भारताने अभूतपूर्व ७३ पदके जिंकली आहेत. आशियाई पॅरा गेम्समधली ही एक अतुलनीय कामगिरी आहे," असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :