Asian Para Games 2023 : निषाद कुमारची ‘सुवर्ण’ झेप, उंच उडीत सुवर्णपदकाला गवसणी | पुढारी

Asian Para Games 2023 : निषाद कुमारची 'सुवर्ण' झेप, उंच उडीत सुवर्णपदकाला गवसणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताच्या निषाद कुमार याने चीनमधील हांगझो येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये आज पुरुषांच्या उंच उडी T47 मध्ये सुवर्णपदक पटकावले. ही कामगिरी करताना त्‍याने नवीन आशियाई विक्रमही प्रस्‍थापित केला आहे.
पुरुषांच्या उंच उडी T47 मध्ये निषादने २.०२ मीटर झेप घेत सुवर्णपदक पटकावले. चीनच्या होंगजी चेनने 1.94 मीटरच्या प्रयत्नात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या राम पालनेही पाचव्या प्रयत्नात 1.94 मीटर नोंदवत रौप्यपदक मिळवले.

पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा डंका

प्राची यादवने महिलांच्या VL2 फायनलमध्ये कॅनोईंगमध्ये रौप्यपदक पटकावले आणि भारताचे खाते उघडले. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समधील भारताचे वर्चस्व शैलेश कुमार, मरियप्पन थांगावेलू आणि रामसिंग पडियार यांनी सोमवारी पुरुषांच्या उंच उडी-T63 स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.

इंडोनेशियामध्ये 2018 मध्ये झालेल्‍या  स्पर्धेत भारताने 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 33 कांस्य पदकांसह 72 पदके पटकावली हाेती. नुकत्याच संपलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने 107 पदके जिंकून नवा विक्रम प्रस्‍थापित केला होता. आता यंदाची आशियाई पॅरा गेम्समध्‍यही भारताचे क्रीडापटू पदकांची लयलूट करतील, असा विश्‍वास व्‍यक्‍त होत आहे.

Back to top button