आशियाई पॅरा गेम्स : बॅडमिंटन मिश्र दुहेरी स्पर्धेत भारताला कांस्य

आशियाई पॅरा गेम्स : बॅडमिंटन मिश्र दुहेरी स्पर्धेत भारताला कांस्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. भारताने बॅडमिंटन मिश्र दुहेरी SL3-SU5 मध्ये आणखी एक पदक पटकावले आहे. नितेश कुमार आणि तुलसीमाथी मुरुगेसन यांनी कांस्यपदक जिंकले आहे.

आशियाई पॅरा गेम्समध्‍ये भारताकडून पदकांची लयलूट सुरूच आहे. भारताच्या श्रेयांश त्रिवेदीने पुरुषांच्या २०० मीटर टी -३७ धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. २५.२६ सेकंदात त्याने ही कामगिरी केली. पुरुषांच्या २०० मीटर टी ३५ धावण्याच्या स्पर्धेत नारायण ठाकुरने २९.८३ सेकंद नोंदवत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. याच स्पर्धेत रवी कुमार ३१.२८ सेकंदांसह पाचव्या स्थानावर राहिला. (AsianParaGames)

आशियाई पॅरा गेम्समध्‍ये तिसऱ्या दिवशी भारताने टेबल टेनिसमध्येही खाते उघडले. टेबल टेनिस महिला एकेरी – वर्ग ४ क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवले. भालाफेकमध्ये भारताच्या सुमित अंतिलने इतिहास रचला. पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुमितने ७३.२९ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले, तर पुष्पेंद्र सिंगने ६२.०६ मीटरच्या थ्रोसह कांस्यपदकावर नाव कोरले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news