Asian Games 2023 | भारताने जिंकले पहिले सुवर्ण; पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये इतिहास रचला

Asian Games 2023
Asian Games 2023

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा २०२३ च्या स्पर्धेत भारतीय नेमबाजी संघाने इतिहास रचला आहे. भारताच्या १० मीटर पुरुष रायफल संघाने १८९३.७ गुण मिळवून जागतिक विक्रम मोडला आणि सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाने चीनचा  १८९३.३ गुणांचा विक्रम मागे टाकला. चीनने यावर्षी बाकू चॅम्पियनशिपमध्ये हा विक्रम केला होता. हा विक्रम मोडत भारतीय संघाने सुवर्णपदकही पटकावले. २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. रुद्रांक्ष, ऐश्वर्य आणि दिव्यांश या तिघांनी १८९३.३ गुणांची कमाई करत विक्रम केला.

रुद्रांकेश पाटील
रुद्रांकेश पाटील

संबधित बातम्या

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक

चीनमधील हांगझोऊ येथे १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा  २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होत आहेत. या कालावधीत ४० खेळांमध्ये एकूण ४८२ स्पर्धा होत आहेत. ज्यात १०,००० हून अधिक ४५ देशांतील खेळाडू सहभागी झाले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकत १० मीटर एअर रायफलमध्ये इतिहास रचला आहे. १८९३.७ च्या एकूण गुणासंह हा विश्वविक्रम केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

कोरिया प्रजासत्ताक दुसऱ्या, चीन तिसऱ्या स्थानावर

भारताच्या रुद्रांकेश पाटील, दिव्यांश सिंग आणि ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर या तिघांनी हे यश मिळवले आहे. कोरिया प्रजासत्ताक १८९०.१ गणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि चीन १८८२.२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. तत्पूर्वी, भारताने रविवारी एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले, तर नौकानयनातही दोन रौप्य आणि एक कांस्य पदकांसह, भारताने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एकूण पाच पदके जिंकण्यात यश मिळविले. आज (दि.२५)  क्रिकेटमधील मोठा दिवस आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा सुवर्णपदकासाठी सामना श्रीलंका महिलांविरुद्ध होणार आहे. याशिवाय टेनिस आणि वुशूमध्ये भारतीय खेळाडू आपल्या मोहिमेला सुरुवात करतील.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news