Asian Games 2023 | भारतीय हॉकी संघाचा विजयी ‘चौकार’, बांगलादेशवर डागले डझनभर गोल

Asian Games 2023 | भारतीय हॉकी संघाचा विजयी ‘चौकार’, बांगलादेशवर डागले डझनभर गोल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय पुरूष हॉकी संघाने आज आशियाई क्रीडा स्पर्धेत विजयी चौकार मारला. भारतीय संघाने आजही दमदार कामगिरी केली. पाकिस्तानचा दारूण पराभव केल्यानंतर भारतीय संघाने आज (दि.२) बांगलादेशवर मात केली. भारताने बांगलादेशवर १२ गोल डागले. बांगलादेशला एकही गोल करण्याची संधी भारताने दिली नाही. हरमनप्रीत सिंगने बांगलादेशविरुद्ध हॅट्र्टिक साधत ३ गोल केले. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांचा हा पूल स्टेजमधील शेवटचा सामना होता. भारताने चार सामने जिंकून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. (Asian Games 2023)

संबंधित बातम्या 

भारताने खेळाच्या सुरुवातीला पहिल्या क्वॉर्टरमध्ये तिसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल नोंदवत १-0 अशी आघाडी घेतली. पुढच्या दुसऱ्या मिनिटाला भारताने दुसरा गोल डागला. हे दोन्ही गोल हरमनप्रीत कौरने केले. हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारतीय संघाने  २-० ने आघाडी घेतली. त्यानंतर मनदीप सिंग याने तिसरा गोल नोंदवत ३-० अशी आघाडी घेतली. तर चौथा गोल ललित उपाध्याय याने केला. मनदीप सिंहने आणखी एक गोल करत भारताला दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये ५-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये सहावा गोल अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केला.

हरमनप्रीत सिंगने बांगलादेशविरुद्ध हॅट्र्टिक साधत तिसर्‍या क्वॉर्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरद्वारे भारतासाठी सातवा गोल केला. त्यानंतरही भारताने गोलचा धडाका कायम ठेवत बांगलादेशविरुद्ध तिसरा हाफ संपेपर्यंत ८-० ने आघाडी घेतली होती. चौथ्या क्वॉर्टरमध्ये भारताने आणखी ४ गोल करत १२-० ने आघाडी घेतली.

भारताने सुरुवातीपासून बांगलादेशविरुद्ध वर्चस्व राखले. भारताने बांगलादेशला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचा हा सलग चौथा विजय आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news