पुढारी ऑनलाईन डेस्क : स्क्वॉश फायनलमध्ये भारताच्या संघाने आज इतिहास घडवला. फायनलमधील तिसर्या सामन्यात पाकिस्तानच्या नूरचा पराभव करत अभयसिंगने सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. या खेळात पहिल्यापासूनच पाकिस्तानचा दबदबा राहिला आहे मात्र यंदाच्या आशिया क्रीडा स्पर्धेत फायनलमध्ये साैरव घाैषाल आणि अभयसिंग यांनी पाकिस्तानची मिरासदारी मोडून काढत चीनमध्ये तिरंगा फडकवला. ( Asian Games Squash )
संबंधित बातम्या :
स्क्वॉशच्या फायनलमध्ये तीन सामन्यांपैकी पहिला सामना भारताने गमावला होता. महेश माणगावकरला पाकिस्तानच्या नासिर इक्बालने 3-0 अशा फरकाने पराभूत केले होते. मात्र दुसर्या सामन्यात सौरव घोषाल याने पाकिस्तानच्या एम.ए. खान याचा पराभव भारताचे आव्हान जिंवत ठेवले .यानंतर अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या अंतिम समान्यात अभय सिंगने पाकिस्तानच्या जमान नूरचा 11-7, 9-11, 7-11, 11-9, 12-10 असा पराभव करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. फायनल सामन्यात भारताने पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला.
2014 नंतर प्रथमच भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत हे पदक जिंकले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील या खेळातील भारतीय संघाचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी 2014 मध्ये भारताने मलेशियाला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. ( Asian Games Squash )
भारताचा स्क्वॉशपटू सौरव घोषालनं राष्ट्रकुलमध्ये पुरुष एकेरीत रौप्यपदक पटकावले होते. २०१३ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या जागतिक स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा सौरव पहिला भारतीय ठरला होता. त्यानंतर सौरवने एकामागून एक आंतरराष्ट्रीय स्तरावर जेतेपदे पटकावली होती आणि या खेळात आपली जगात ओळख निर्माण केली. २०१८ साली गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सौरवनं मिश्र दुहेरीत रौप्य पदक पटकावलं होतं; पण राष्ट्रकुल स्पर्धेत वैयक्तिक पदकानं त्याला नेहमीच हुलकावणी दिली होती. १९९८ साली स्क्वॉशचा राष्ट्रकुलमध्ये समावेश झाला. पण स्क्वॉशच्या वैयक्तिक प्रकारात पदकासाठी भारताला तब्बल २४ वर्ष वाट बघावी लागली होती. आता आशिया क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्ण पदक पटकविताना साैरव घाेषाल आणि अभय सिंह यांनी दमदार कामगिरी करत त्यांनी नवा इतिहास रचला आहे.
उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या महिलांच्या स्क्वॉश संघाने कांस्य पदक पटकावले.
हेही वाचा :