पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : भारताची महिला बॉक्सिंगपटू परवीन हुड्डा हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी चमकदार कामगिरी केली. तिने महिलांच्या 57 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानची बॉक्सिंगपटू सिटोरा तारदीबेकोवाविरुद्धची लढत 5-0 ने जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारली. यासह परवीनने किमान कांस्यपदक निश्चित केले असून पॅरिस ऑलिम्पिकसाठीचे तिकीट मिळवले आहे.