SAFF U-19 : भारताने पाकिस्तानला चिरडले, टीम इंडिया बनली अंडर-19 फुटबॉल चॅम्पियन | पुढारी

SAFF U-19 : भारताने पाकिस्तानला चिरडले, टीम इंडिया बनली अंडर-19 फुटबॉल चॅम्पियन

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटपाठोपाठ भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतही पाकिस्तानचा पराभव केला आहे. 2023 मध्ये चीनमध्ये होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गेल्या काही दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानला अनेक खेळांमध्ये पराभूत केले आहे. चीनपाठोपाठ आता भारताने नेपाळमध्येही पाकिस्तानला पुन्हा धुळ चारूली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून भारत दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF U-19) अंडर-19 पुरुष चॅम्पियनशिप 2023 चा चॅम्पियन बनला आहे.

मँगलेंथांग किपगेन याच्या शानदार खेळामुळे भारताने शनिवारी सॅफ अंडर-19 (SAFF U-19) फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा धुव्वा उडवत 3-0 गोल फरकाने दणदणीत विजय मिळवला. मँगलेंथांगने 64व्या आणि 85व्या मिनिटाला गोल केल्यानंतर अखेरच्या क्षणांमध्ये (90+5 मिनिटे) ग्वागवानसार गोयारे याने भारतासाठी तिसरा गोल डागून विजयावर शिक्कामोर्तब केला. सॅफ चॅम्पियनशिपमधील भारताचे हे आठवे युवा विजेतेपद ठरले आहे.

याआधी उपांत्य फेरीत भारताने यजमान नेपाळ संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विशेष म्हणजे नुकतेच भारताने सिनियर सॅफ चॅम्पियनशिपचे विजेतेपदही पटकावले होते. म्हणजे सिनियर्सनंतर आता ज्युनिअर्स खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली आहे.

संबंधित बातम्या

भारताच्या विजयाचा नायक कोण? (SAFF U-19)

नेपाळविरुद्धच्या उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल नोंदवून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा किपगेन पुन्हा एकदा हिरो म्हणून समोर आला. त्याने 64व्या आणि 85व्या मिनिटाला गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, शेवटच्या क्षणी म्हणजेच 90 मिनिटांनंतर दिलेल्या अतिरिक्त पाच मिनिटांत त्याने ग्वागवानसार गोयारेला सहाय्य करत गोल करण्याची संधी निर्माण केली. अशा प्रकारे भारताने हा सामना 3-0 असा जिंकला.

Back to top button