केंद्र सरकारकडून भारताला पाकिस्तान बनवण्याचे काम : अशोक गहलोत

अशोक गहलोत
अशोक गहलोत

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : धर्माच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाली होती. मात्र, आता हिंदू धर्माच्या नावावर देश बनविण्याचे काम केंद्रातील मोदींच्या सरकारने सुरू केले आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे दावेदार अशोक गेहलोत यांनी केली. ते संगमनेरमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

गेहलोत यावेळी म्हणाले की, सध्या देशामध्ये मोदी सरकारमुळे महागाई, बेरोजगारी वाढलेली आहे. ईडीचे हत्यार उपसल्यामुळेच महाराष्ट्रात शिवसेनेचे ५० आमदार पळाले. गोव्यात सुद्धा गुरा ढोरासारखे आमदार विकले गेले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल आणले, मात्र सध्या लोकपाल आणि अण्णा हजारे कुठे आहेत? यावर कोणी काहीच का बोलत नाही? असा सवालही गेहलोत यांनी मोदी सरकारला उद्देशून केला.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशातील वातावरण बदलू लागले आहे. गांधी परिवाराने होकार दिल्यानंतर मी अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहे. तसेच अध्यक्षपदाची माळ तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्याच गळ्यात पडणार असल्याचेही यावेळी गहलोत म्हणाले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशात राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेना व इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा अध्यक्ष निवडला जात असताना फारशी चर्चा होत नाही. मात्र, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवेळी मोठी चर्चा का होते? असा सवाल उपस्थित करून, काँग्रेसला नेहरु, गांधी घराण्याचा इतिहास आहे. हा इतिहास घराणेशाहीचा नसून बलिदानाचा इतिहास आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news