पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यात दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राची जी भूमिका सर्वोच्च न्यायालयात आहे तीच कायम स्पष्ट राहणार असल्याचे स्पष्ट केले. तरी देखील बेळगाव, कारवार, निपाणीवर दावा असल्याचे 'ते' म्हणतात. विरोधकांचा मळमळ काही केल्या थांबत नाही, त्यामुळे त्यांच्या या मळमळीवर आता औषध नाही, अशी मिश्किल टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी विरोधकांसह ठाकरे गटावर केली आहे.
पुढे शेवार यांनी म्हटले आहे की, स्वत: काही करायचे नाही आणि चांगले काही होऊ द्यायचे नाही, हा शिवसेनेचा दंडक राहिला, असा आरोपदेखील त्यांनी शिवसेनेवर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकीमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तणाव निवळत असल्याने संजय राऊत यांना त्रास होणे स्वाभाविक आहे. असे देखील आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सीमावाद धुमसत आहे. यावर या दोन्ही राज्यातील सीमावायींच्या मनात अंतोषाची लाट आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधी राजकीय मंडळींमध्ये देखील महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्नावर फैरी उडत आहेत. यानंतर विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने थेट देशाचे गृहराज्यमंत्री अमित शहा यांना निवेदन देत या प्रश्नात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. याची दखल घेत अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची त्यांच्या दिल्ली येथील निवस्थासस्थानी भेट घेत चर्चा केली. यानंतर सरकारने महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट केली.