पुढारी ऑनलाइन डेस्क : ASEAN-India Summit 2023 : आसियान संबंधित बैठकांसाठी आणि विविध नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करून म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसियान-भारत शिखर परिषदेसाठी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे पोहोचले आहेत. जकार्ता येथे अनिवासी भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत केले. G20 शिखर परिषदेपूर्वी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पंतप्रधान मोदींसोबत आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत.
जकार्ता विमानतळावर अनिवासी भारतीयांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. संपूर्ण शहर मोदी-मोदी आणि भारत मातेच्या जयघोषाने दुमदुमले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी केवळ ज्येष्ठच नाही तर वृद्ध आणि लहान मुलेही जमली होती. पारंपारिक वेशभूषेत आलेले लोक अभिमानाने तिरंगा फडकावत होते. पंतप्रधान मोदींनी अनिवासी भारतीयांचीही भेट घेतली आणि त्यांना हस्तांदोलन करून अभिवादन केले. रिसेप्शनमधील लोकांचे म्हणणे आहे की पीएम मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्यामुळे खूप आनंद झाला आहे. आम्ही त्याच्या स्वागतासाठी आलो आहोत.
पीएम मोदी आसियान सदस्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांसह सरकार प्रमुखांसह आसियान इंडिया समिटमध्ये सहभागी होतील. पूर्व आशिया शिखर परिषद ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपान, कोरिया प्रजासत्ताक, न्यूझीलंड, रशिया आणि युनायटेड स्टेट्सला एकत्र आणते. पंतप्रधान मोदी यावेळी नवव्या आसियान भारत शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
भारताचे राजदूत जयंत खोबरागडे यांनी म्हटले आहे की, भारत आपले क्षेत्र आणि आसियन केंद्रीयतेला किती महत्व देतात याचा संदेश जागतिक मंचावर पोहोचणार आहे. ते पुढे म्हणाले, भारताने 90 च्या दशकात लूक ईस्ट धोरण अवलंबले होते. मात्र, 2014 नंतर अॅक्ट इस्ट हे धोरण अवलंबले आहे. हे धोरण हिंद-प्रशांत महासागरात प्रथमच विकसित झाली आहे. त्यामुळे याची व्यापकता वाढली आहे.
हे ही वाचा :