पंतप्रधान माेदी आसियान-भारत शिखर संमेलनात सहभागी हाेणार | पुढारी

पंतप्रधान माेदी आसियान-भारत शिखर संमेलनात सहभागी हाेणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी २० व्या आसियान-भारत शिखर संमेलनात सहभागी हाेणार आहेत. पंतप्रधान येत्या ६ आणि ७ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय जकार्ता, इंडोनेशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली ९ आणि १० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० शिखर संमेलनापूर्वी होणाऱ्या या संमेलनाला पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे महत्व आले आहे. गतवर्षी इंडोनेशियात जी-२० संमेलन आयोजित करण्यात आले होते.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शिखर संमेलनादरम्यान उभय नेत्यांकडून भारत-आसियान संबंधाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल. यासोबतच पूर्व आशिया शिखर संमेलनात आसियान देशाचे नेते तसेच भारतासह आठ भागीदार क्षेत्रीय आणि जागतिक महत्वाच्या मुद्यावर विचारांचे आदान-प्रदान करतील.

२०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती विडोडो यांच्या आमंत्रणावर जकार्ताचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान उभय नेत्यांनी इंडोनेशिया आणि भारत दरम्यान द्विपक्षीय संबंधांना एक नवीन उंचीवर नेण्यासाठी एक नवीन व्यापक धोरणात्मक सहकार्यासाठी सहमती दर्शवली होती. आता इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या आमंत्रणावर ते २० व्या आसियान-भारत शिखर संमेलन आणि आसियानचे विद्यमान अध्यक्ष म्हणून इंडोनेशियाने आयोजित केलेल्या १८ व्या पूर्व आशिया शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा :

 

 

Back to top button