Laal Singh Chaddha : नेटकऱ्यांनी आमिरच्या अभिनयाची उडवली खिल्ली

laal singh chaddha
laal singh chaddha
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूरचा आगामी 'लाल सिंग चड्ढा' ( Laal Singh Chaddha) चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. आईपीएल २०२२ च्या फायनल दरम्यान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मात्र, 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच नेटकऱ्यांनी आमिरच्या अभिनयाची जोरदार खिल्ली उडवत कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे. . एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर क्रिकेटच्या मेगा इव्हेंटमध्ये प्रसिद्ध करण्याची ही चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिलीच वेळ. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा ट्रेलर यू ट्यूब आणि अन्य सोशल मीडियावरही शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, लाल सिंह चढ्ढा, एका सामान्य माणसाचा असामान्य प्रवास जो तुम्हाला आनंद देईल आणि हसवेलही! यामध्ये आमीर खान, करिना कपूर आणि मोना सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होईल. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना हसू आवरेना. त्यांनी आमिरच्या अभिनयाची खिल्ली उडवलीय.

'लाल सिंग चड्ढा' ( Laal Singh Chaddha) अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये एक पांढऱ्या रंगाच्या पक्षाचे पंख रेल्वेच्या डब्यात आमिरच्या पायाजवळ आल्याचे दाखवण्यात आलं आहे. यानंतर त्याला आपला जीवनाचा प्रवास आठवण्यास सुरूवात होते. यात लहान वयात दिव्यांग असलेल्या एका मुलाची गोष्ट दाखवण्यात आली. हाच मुलगा नंतर धावण्याच्या शर्यतीत पहिला नंबर मिळवतो. तर शेवटी तो आपल्या देशाच्या सुरक्षा दलामध्ये कार्यरत होतो. यातील सर्व कठिण प्रसंग दिग्दर्शकांनी अचूक मांडले आहेत. परंतु, हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी आमिरच्या अभिनयाची खिल्ली उडवली आहे.

आमिर खान ट्रोल

'लाल सिंग चड्ढा' चित्रपटातील आमिरची भूमिका 'धूम 3' आणि 'पीके' चित्रपटाची कॉपी केल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. यात काही नेटकऱ्यांनी 'चित्रपटाला मोठी चूक आहे', 'हा फॉरेस्ट गंप नाही, हा फॉरेस्ट डंप आहे', 'खूपच बकवास ट्रेलर', 'लालसिंग चड्डा बकवास असून एकही सीन पाहण्यासारखा नाही', 'हा चित्रपट कशाला बनवला गेला आहे?', 'अरे भाऊ, ओरिजनल दाखव, डुप्लिकेट नको'. यासारख्या कॉमेन्टस करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

तर काही नेटकऱ्यांच्या ट्रेलर पसंतीस उतरला आहे. याच दरम्यान ट्विटरवर #BoycottLaalSinghCaddha ट्रेंड सुरू झाला आहे. आमिर खान टॉम हँक्सची कॉपी करण्याचा प्रयत्न करण्यात अपयशी ठरला आहे असेही म्हटले आहे.

या चित्रपटात आमिर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आमिरसोबत नागा चैतन्य, मोना सिंग हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news