अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकला. अंमली पदार्थ कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. या क्रुझमधून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर त्यांना अटक केली. समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे धडाकेबाज अधिकारी आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का, त्यांची पत्नी एक प्रसिध्द अभिनेत्री आहे? तर मग जाणून घेऊया समीर आणि त्यांच्या पत्नीविषयी.
समीर हे क्रांती रेडकर हिचे पती आहेत. क्रांती एक मराठमोळी अभिनेत्री आहे. तिचा जन्म मुंबईत झाला. खरंतरं, अभिनय क्षेत्रात येण्यास ती उत्सुक नव्हती. पण, तिला व्यावसायिक शोच्या ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात गांभीर्याने येण्याचा विचार केला.
तिने सुन असावी अशी या मराठी चित्रपटातून डेब्यू केला. पण, तिला कोंबडी पळाली या गाण्यातून प्रसिध्दी मिळाली. हे गाणे भरत जाधव आणि क्रांतीवर चित्रीत करण्यात आले होते. २००६ मध्ये माझा नवरा तुझी बायको, २०१० मध्ये शिक्षणाच्या आयचा घो, नो एन्ट्री पुढे धोका आहे, शुगर, सॉल्ट आणि प्रेम, ऑन ड्युटी २४ तास, लाडी गोडी, तिने हिंदी चित्रपटामध्ये काम केलंय. प्रकाश झा दिग्दर्शित चित्रपट गंगाजलमध्ये तिची छोटी भूमिका होती.
त्यानंतर तिने काही हिंदी मालिका केल्या. चित्तोड की राणी आणि लेडीज स्पेशल, सिंपली सपने या मालिकांचा यामध्ये समावेश आहे.
तिने कांकण या मराठी चित्रपटासाठी दोन गाणी देखील लिहिली आहेत. ती उत्तम डान्सरदेखील आहे. तिला स्टेज शोड आणि अनेक कार्यक्रमांसाठी पुरस्कारदेखील मिळाले आहेत. तिने श्रीमंत दामोदर पंत या नाटकामध्येही काम केलंय.
क्रांतीने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने समीर यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. ती म्हणते- एक पत्नी म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. ते फार कष्टाळू आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेक प्रकरणे हाताळली आहेत. पण हे प्रकरण बॉलिवूडशी संबंधित असल्यामुळे सध्या जास्त चर्चा सुरु आहे.
क्रांती म्हणते, जेव्हा समीर एखादे प्रकरण हाताळतात. तेव्हा मी त्यांच्या कामामध्ये येत नाही. त्यांना त्यांचं काम करू देते. मी घराकडे लक्ष देते. ते केवळ २ तास झोपतात. सातत्याने त्यांना फोन सुरू असतात, त्यावेळी मी कोण, काय, कसासाठी असे प्रश्न विचारत नाही. मला माहित आहे की, त्यांच्यावर कामाचा किती भार असतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाकडे व्यवस्थित लक्ष देता येईल. जेव्हा ते त्यांच्या सिक्रेट ऑपरेशनवर काम करतात. तेव्हा घरीत कुठलीही माहिती देत नाहीत. आणि आम्हीही त्यांना विचारत नाही. मी त्यांच्या कामाचा आदर करते. ते याबाबत कधीच तक्रार करत नाहीत.
समीर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे अधिकारी आहेत. त्यांनी विवेक ओबेरॉय, अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा यांच्या घरावर छापे टाकले आहेत. समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबई विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली झाली होती. कस्टममधून त्यांची बदली नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनबीसी) मध्ये करण्यात आली आहे.
गायक मिका सिंगला मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. ही कारवाईही समीर यांनी केली होती. बेकायदेशीररित्या परदेशी चलन बाळगल्याप्रकरणी मिकाला ताब्यात घेण्यात आलं होतं.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अमली पदार्थांसंदर्भातील तपासही समीर यांच्याकडे देण्यात आला होता.