Arvind Kejriwal: ‘गोवा पोलिसांसमोर निश्चितपणे हजर राहू’; नोटिशीवर केजरीवाल यांची प्रतिक्रिया

Arvind Kejriwal: ‘गोवा पोलिसांसमोर निश्चितपणे हजर राहू’; नोटिशीवर केजरीवाल यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: विधानसभा निवडणुक २०२२ च्यावेळी सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स लावल्याच्या प्रकरणात गोवा पोलिसांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना नोटीस बजावली आहे. यावर प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांनी निश्चितपणे २७ एप्रिल रोजी गोव्याला जाऊन आपण पोलिसांसमोर बाजू मांडू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  यांना गोव्याच्या पेर्नेम पोलिसांकडून समन्स बजावण्यात आला आहे. दरम्यान, गोवा पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर पोस्टर्स लावून, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी केजरीवाल यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. यानुसार त्यांना २७ एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. यावर अरविंद केजरीवाल यांनी 'निश्चितपणे हजर राहू' अशी बेधडक प्रतिक्रिया दिली आहे.

पेर्नेम पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीपकुमार हर्लनकर यांनी केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना नोटीस बजावत २७ एप्रिलला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४१ [ए] नुसार आपचे समन्वयक असलेल्या केजरीवाल यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने दोन जागा जिंकल्या होत्या.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news