J&K | जम्मू- काश्मीरच्या उधमपूरमध्ये फूटब्रीज कोसळला, ६ जखमी, बचावकार्य सुरू

J&K | जम्मू- काश्मीरच्या उधमपूरमध्ये फूटब्रीज कोसळला, ६ जखमी, बचावकार्य सुरू
Published on
Updated on

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर : येथील उधमपूरच्या चेनानी ब्लॉकमधील बैन गावातील बेनी संगम येथे बैसाखी उत्सवादरम्यान एक फूटब्रीज कोसळला. या घटनेत १० ते १२ लोख जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. पोलिस आणि इतर पथके घटनास्थळी पोहोचली आहेत, अशी माहिती उधमपूरचे एसएसपी डॉ. विनोद यांनी दिली आहे.

चेनानी ब्लॉक येथे बैसाखी उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी येथे हजारो लोक पोहोचले होते. या दरम्यान, देविका नदीवरील लोखंडी पूल अचानक कोसळला. यामुळे एकच गोंधळ उडाला. पूलाखाली अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी दिसत असून बचावकार्य सुरु आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news