अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू

अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू

इटानगर (अरुणाचल प्रदेश) : अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातील टुटिंग मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगिंग गावाजवळ आज शुक्रवारी सकाळी भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील २ मृतदेह मिळाले आहेत. तिसरा मृतदेह शोधण्याचे काम सुरु असल्याचे Indian army ने म्हटले आहे. ज्या ठिकाणी ही दुघर्टना झाली आहे ते ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. घटनास्थळी बचावपथक पोहचले असून शोधमोहीम सुरु आहे. घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अवशेष आढळून आले आहेत. याची अधिक चौकशी सुरु आहे.

अत्याधुनिक कमी वजनाचे हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सियांग जिल्ह्यातील तुटिंग क्षेत्राजवळ आज सकाळी १०.४० च्या सुमारास कोसळले होते. अप्पर सियांगचे पोलीस अधीक्षक जुम्मर बसर यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते की, "दुर्घटनेचे ठिकाण रस्त्याने जोडलेली नाही. बचाव पथकाला पाठवण्यात आले आहे." लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारे हे हेलिकॉप्टर नियमित उड्डाण करत होते. या दरम्यान दुर्घटना घडली आहे.

याआधी ५ ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला अरुणाचल प्रदेशातील तमांगजवळ भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत 'चित्ता' हेलिकॉप्टरमधील पायलटचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला होता. तर आज झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news