केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले : ७ जण ठार | पुढारी

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले : ७ जण ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमध्ये आज (दि. १८) दुपारी बाराच्या सुमारास केदारनाथ धाममध्ये हेलिकॉप्टर कोसळले. केदारनाथपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गरुडचट्टी येथे ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात ७  जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथ यात्रेकरूंना घेऊन जात होते. मदत आणि बचाव कार्यासाठी प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

हे हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. यात पायलटसह ७ जण होते. सर्वांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. केदारनाथमध्ये दर्शन करून भाविक परतत असताना हा अपघात झाला. जोरात स्फोट झाल्याने हेलिकॉप्टरला आग लागली. रुद्रप्रयागपासून दोन किमी अंतरावर हेलिकॉप्टर कोसळले. अपघाताच्या ठिकाणी दाट धुके असून हलकासा बर्फवृष्टीही होत आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम बचाव कार्यात सहभागी झाली आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेबाबत उत्तराखंड सरकारशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button