पुढारी ऑनलाईन डेस्क: अयोध्येत सोमवार, २२ जानेवारी राेजी मोठ्या उत्साहात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्तीची राम मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा झाला. मूर्तीकार अरुण योगीराज यांनी घडवलेल्या रामलल्ला मूर्तीचे प्रसिद्ध जागतिक वाळू शिल्पकार 'सुदर्शन पटनायक' यांनी देखील कौतुक केले आहे. (Arun Yogiraj on Sudarsan Pattnaik)
रामलल्ला मूर्ती शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रशंसा जागतिक दर्जाचे वाळू शिल्पकार 'सुदर्शन पटनायक' यांनी केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून केलेल्या पाेस्टमध्ये म्हटलं आहे की, 'अरुण योगीराज' जी तुम्हाला खरोखर भगवान विश्वकर्माचे वरदान लाभले आहे. एक कलाकार म्हणून भगवान राम लल्लाचे तुमचे शिल्प माझ्यासाठी हृदयस्पर्शी आहे. प्रभू रामाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो. जय श्री राम. (Arun Yogiraj on Sudarsan Pattnaik)
प्रिय महोदय, जगातील एका प्रसिद्ध वाळू कलाकाराची प्रशंसा मिळणे हे माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. हे मला माझ्या कलेच्या क्षेत्रात अधिक काम करण्यास नक्कीच प्रेरित करेल, असे म्हणत अरुण योगीराज यांनी जागतिक दर्जाचे वाळू शिल्पकार 'सुदर्शन पटनायक' यांचे आभार मानले आहेत. (Arun Yogiraj on Sudarsan Pattnaik)