Ram Mandir PranPrathistha: ‘मी पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती…’ : शिल्पकार अरुण योगीराज

Ram Mandir PranPrathistha
Ram Mandir PranPrathistha

पुढारी ऑनलाईन डेस्क: अयोध्येत आज ( दि. २२) रामलल्‍ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला,  या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 'मी पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती' अशी पहिली प्रतिक्रिया कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण याेगीराज यांनी दिली आहे. (Ram Mandir PranPrathistha)

शिल्पकार अरुण योगीराज यांनी  म्हटले आहे की, मी स्वतःला या पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती मानतो की, माझे शिल्प अयोध्येत रामलल्‍ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निवडले गेले आहे. माझ्या पूर्वजांचा, कुटुंबातील सदस्यांचा आणि प्रभू रामलल्लाचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. कधीकधी मला असे वाटते की, मी स्वप्नांच्या जगात आहे, असेही योगीराज यांनी व्यक्त केले आहे.
(Ram Mandir PranPrathistha)

कोण आहेत मूर्तीकार योगीराज?

प्रसिद्ध शिल्पकार योगीराज हे सर्वपरिचित नाव आहे. म्हैसूर राजवाड्यातील कारागीरांच्या कुटुंबातून ते येतात. याेगीराज  यांच्‍या वडिलांनी गायत्री आणि भुवनेश्वरी मंदिरांसाठीही काम केले आहे. एमबीएचे शिक्षण घेतलेले योगीराज हे पाचव्या पिढीतील शिल्पकार आहेत. एमबीएची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. २००८ मध्ये शिल्पकार बनण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली.

याेगीराज यांनी महाराजा जयचमराजेंद्र वोडेयार यांच्यासह अनेक व्यक्तिमत्त्वांचे पुतळे साकारले आहेत.केदारनाथ येथे स्थापित आदी शंकराचार्यांचा पुतळा तयार करण्याबरोबरच, योगीराज यांनी महाराजा जयचमराजेंद्र वोडेयर यांचा १४.५ फूट पांढरा संगमरवरी पुतळा तयार केला आहे. महाराजा श्री कृष्णराजा वाडेयर-चतुर्थ आणि म्हैसूरमधील स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा पांढरा संगमरवरी पुतळाही त्यांनी तयार केला आहे. अरुण यांनी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा साकारला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news