Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर फलंदाजीत फ्लॉप, करियर धोक्यात?

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर फलंदाजीत फ्लॉप, करियर धोक्यात?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या अर्जुन तेंडुलकर रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळत आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून त्याने आपल्या रणजी कारकिर्दीची धमादेकार सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या अर्जुनला फलंदाजीत सातत्य राखता आलेल नाही. पदार्पणापासून अर्जुन फलंदाजीत सातत्याने फ्लॉप ठरत आहे. (Arjun Tendulkar)

राजस्थानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर अर्जुन झारखंडविरुद्ध झालेल्या पुढच्या सामन्यात १ धाव करून बाद झाला. यानंतर कर्नाटकविरुद्ध अर्जुन पहिल्याच चेंडूवर धावांवर बाद झाला. त्याला धावांचे खाते ही उघडता आली नाही. केरळविरुद्धही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो फक्त ६ धावाकरून बाद झाला. (Arjun Tendulkar)

अर्जुनने रणजीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले होते. जणू त्याने आपल्या आगमनाचे संकेत दिले होते. पण पहिल्या डावानंतरच तो गडबडलेला होता. अर्जुन तेंडुलकरच्या शतकानंतर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी याचे श्रेय घेतले होते.

योगराज सिंग यांच्या देखरेखीखाली अर्जुन क्रिकेटचे धडे गिरवत आहे. योगराज सिंग यांनी म्हणाले होते की, अर्जुनला मी जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम माणूस बनवीन. अर्जुनच्या निराशाजनक कामगिरीवर योगराज सिंह यांनी अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news