Koffee With Karan 8 : मलायकाशी लग्नाबद्दल अर्जुन कपूरने दिली मोठी हिंट

malaika arora
malaika arora

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा वैयक्तीक लाईफविषयी चर्चेत राहतो. (Koffee With Karan 8) अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या रिलेशनशीपबद्दलही चर्चा होत राहते. सोशल मीडियावर नेहमी एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगलादेखील सामोरे जावे लागते. आता कॉफी विथ करण ८ मध्ये अर्जुन कपूरने रिलेशनशिप विषयी बातचीत केली. (Koffee With Karan 8 )

संबंधित बातम्या –

ट्रोलिंगवर काय म्हणाला अर्जुन कपूर?

कॉफी विथ करण ८ व्या एपिसोडमध्ये करण जोहरने ऑनलाइन शेमिंग आणि ट्रोल्सच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी करणने अर्जुनला विचारलं की, तो ९ वर्षांनी मोठ्या मलायकासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. अशा परिस्थितीत ऑनलाईन निगेटिव्हीटी आणि ट्रोल्सचा त्यांच्या रिलेशनशीपवर काय परिणाम होतो. यावर अर्जुन म्हणाला, 'असा कोणताही व्यक्ती नाही, ज्याच्यावर परिणाम होत नसतो. तुम्हाला यासाठी डील करावं लागतं. हे सर्व लोक केवळ तुमचं लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जे केवळ रँडम कॉमेंट्स आहेत.'

रिलेशनशीपवर ट्रोलिंगचा परिणाम?

अर्जुन कपूर म्हणाला की, त्याला आधी या सर्वांना उत्तर द्यावेसे वाटायचे. मग त्याला समजलं की, लोक केवळ माझे लक्ष केंद्रीत करू इच्छितात. याने मला काही फरक पडतो का ? हो . फरक पडतो. कधी मीम किंवा मीम पेजवर आमच्याबद्दल येतं. तर त्यांना लाईक्स मिळावेत, यासाठी ते असे करतात.' यावेळी अर्जुनने मलायकासोबत रिलेशनशिपला पुढे घेऊन जाण्याविषयी सांगितले. अर्जुनने बोलता बोलता सांगितलं की, लग्नाविषयी तो स्वत: योग्य वेळ आल्यानंतर मलायकाशी बोलेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news