Argentina vs Saudi Arabia
Argentina vs Saudi Arabia

Fifa WC Argentina vs Saudi Arabia : कुमकुवत सौदी अरेबियाने मेस्सीच्या अर्जेंटिनाला ठेचले; २-१ ने केला पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  कतारमध्ये खेळविण्यात येत असलेल्या फुटबॉल वर्ल्डकपचा पार वाढत चालला आहे. अवघ्या स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी धक्कादायक निकाल पाहण्यास मिळाला. सर्वांच्या आवडत्या मेस्सीच्या बलाढ्य अर्जेंटिनाला तुलनेने कुमकुवत सौदी अरेबियाने २-१ (Argentina vs Saudi Arabia) अशा फरकाने चिरडले. या धक्कादायक निकालानंतर स्पर्धेतील उत्कंठा वाढली आहे.

सामन्यातील १० व्या मिनिटाला मेस्सीने पेनल्टीवर गोल डागला. या द्वारे अर्जेंटिनाने सौदी अरेबियावर १- ० ने आघाडी घेतली. यानंतर ४८ मिनिटाला सौदीने पुनरागमन करत अर्जेटिनावर गोल केला. यानंतर ५३ व्या मिनिटाला सौदीने पुन्हा अर्जेंटिनावर गोल करत निर्णायक आघाडी घेतली. पुढे अर्जेंटिनाने चांगला डिफेन्स खेळ खेळत अर्जेंटिनाला गोल करण्यापासून रोखून धरले. अशा प्रकारे अर्जेंटिना एकतर्फी जिंकणाऱ्या सामन्यात त्यांनी पराभव पत्करुन नामुष्की ओढवली.

फुटबॉल विश्वचषकातील आजच्या दिवसातील पहिला सामना अर्जेंटिना विरूध्द सौदी अरेबिया यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना कतारच्या लुसेल स्टेडियमवर खेळवण्यात आला. सामन्याच्या सुरूवातीलाच अर्जेटिनाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी करून विरोधी संघावर दबाब टाकण्याचा प्रयत्न केला. याचा त्यांना फायदा झाला. परंतु ते या संधीवर गोल करण्यात अयशस्वी झाले. लिओनेल मेस्सीने गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला सौदी अरेबियाच्या गोलरक्षकाला भेदता आला नाही. (Argentina vs Saudi Arabia)

मेस्सीचा विश्वचषकातील सातवा गोल

सामन्याच्या १० व्या मिनिटाला सौदी अरेबियाच्या खेळाडूने अर्जेंटिनाच्या खेळाडूला डेंजर झोनमध्ये अवैधरित्या अडवले. त्यावेळी रेफरींनी व्हीएआर चेकद्वारे अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली. या संधीचा फायदा घेत संघाचा कर्णधार लियोनेल मेस्सीने बॉलला गोलची दिशा दाखवत संघाला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली.

मार्टिनेझचा गोल अवैध

अर्जेंटिनासाठी लॉटारो मार्टिनेझने सामन्यात दुसरा गोल केला, पण तो गोल रेफरींनी अवैध असल्याचे सांगितले. व्हीएआर तपासणीत मार्टिनेझ ऑफसाइड मध्ये उभे असल्याचे रेफरींना दिसले म्हणून त्यांनी अर्जेंटिंनाला दुसरा गोल दिला नाही.

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये लिओनेल मेस्सीच्या गोलमुळे अर्जेंटिनाने १-० अशी आघाडी घेतली. ती आघा़डी सौदी अरेबिया पहिल्या हाफमध्ये कमी करता आली नाही. अर्जेंटिनाने पहिल्या हाफमध्ये गोलवर पाच शॉट्स मारले. यापैकी दोन शॉट टार्गेटवर होते.

सामन्याच्या दुसऱ्या हाफच्या सुरूवातीपासून सौदी अरेबियाने आक्रमण खेळी करण्यास सुरूवात केली. त्यांनी सामन्यातील ४८ व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल करत अर्जेंटिनाची आघाडी कमी केली. सौदी अरेबियाकडून अल बुरेकनच्या पासवर सालेह अलशेहरीने शानदार गोल केला.

सौदी अरेबियाचा अर्जेंटिनाविरुद्ध दुसरा गोल

सौदी अरेबियाने ५३ व्या मिनिटाला आघाडी दुप्पट केली. सालेम अल्दसरीने संघाचा दुसरा गोल केला. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात असलेल्या अर्जेंटिनाचा पहिल्याच सामन्यात २-१ फरकाने पराभव झाला.

हेही वाचा;

logo
Pudhari News
pudhari.news