Argentina vs France : ५६ वर्षांनंतर एमब्बाप्पेने केली अंतिम सामन्यातील ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी

Argentina vs France : ५६ वर्षांनंतर एमब्बाप्पेने केली अंतिम सामन्यातील ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतारमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात अर्जेटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शुटआऊटवर ४-२ ने पराभव केला. या सामन्यात अर्जेटिनाकड़ून मेस्सीने २ गोल केले. तर, एमबाप्पने ३ गोल करत एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. एमबाप्पे हा अंतिम फेरीत हॅट्ट्रिक करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी ही कामगिरी १९६६ साली झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या ज्योफ हर्स्टने जर्मनीविरुद्धच्या अंतिम सामन्यात तीन गोल केले होते. (Argentina vs France)

अर्जेंटिनाने सामन्याची सुरुवात शानदार शैलीत केली. मेस्सीने २३ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ३६ व्या मिनिटाला एंजल डी मारियाने गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तथापि, एमबाप्पेने हार मानली नाही. पहिल्या हाफनंतरच्या सामन्यात त्याने फ्रान्सला पुन्हा आणले. त्याने उत्तरार्धात आणि अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाला बॅकफूटवर ढकलले. (Argentina vs France)

दुसऱ्या हाफच्या ८० व्या मिनिटाला एम्बाप्पेने गोल करून स्कोअर २-१ असा केला. एका मिनिटातच त्याने दुसरा गोल करून स्कोअर २-२ असा केला. यामुळे अर्जेंटिनाचे ढाबे चांगलेच दणाणले. सामन्याच्या पूर्ण वेळेपर्यंत स्कोर २-२ असा बरोबरीत होता. सामना अतिरिक्त वेळेत गेला आणि १०८ व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने सामन्यातील दुसरा आणि अर्जेंटिनासाठी तिसरा गोल केला. मेस्सीने अतिरिक्त वेळेत गोल करून अर्जेंटिनाला ३६ वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याच्या जवळ आणले, परंतु एमबाप्पेने पेनल्टीद्वारे त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या.

११८ व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या फाऊलवर फ्रान्सला पेनल्टी मिळाली. यावर एम्बाप्पेने गोल करत स्कोअर ३-३ असा केला. अतिरिक्त वेळेअखेर स्कोअर ३-३ असा बरोबरीत राहिला. यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला. फ्रान्सकडून एमबाप्पेने पहिला शॉट घेतला आणि गोल केला. मात्र, त्यांचे दोन्ही फटके अर्जेंटिनाची गोलरक्षक एमी मार्टिनेझने वाचवले. हे निर्णायक ठरले. अर्जेंटिनाने चारही शॉट्सवर गोल केले आणि विश्वचषक ट्रॉफी उंचावली.

फ्रेंच संघाने विश्वचषक जिंकला नसला तरी एम्बाप्पेने सर्वांची मने जिंकली. त्याने या स्पर्धेत एकूण आठ गोल केले आणि तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. एमबाप्पेला गोल्डन बूट मिळाला. विश्वचषक फायनलमध्येही तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तीन गोल करण्याव्यतिरिक्त, एमबाप्पेने २०१८ सालच्या विश्वचषक अंतिम फेरीत एक गोल केला. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत चार गोल करून तो फायनलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news