FIFA WC FINAL : 36 वर्षांनी अर्जेंटिना विश्वविजेता! ‘मेस्सी मॅजिक’चा एमबाप्पेला दणका, पेनल्टी शुटआऊटमध्ये फ्रान्स पराभूत | पुढारी

FIFA WC FINAL : 36 वर्षांनी अर्जेंटिना विश्वविजेता! ‘मेस्सी मॅजिक’चा एमबाप्पेला दणका, पेनल्टी शुटआऊटमध्ये फ्रान्स पराभूत

पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल 140 मिनिटांहून अधिकवेळ रंगलेल्या रोमांचकारी सामन्यात अर्जेटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शुटआऊटवर ४-२ ने पराभव करत तब्बल ३६ वर्षांनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. मेस्सीला टक्कर देणा-या एमबाप्पेने या सामन्यात तीन गोल करून फ्रान्सच्या विजयाची आशा पल्लवीत केली, पेनल्टी शुटआऊटमध्ये त्याचा संघ अपयशी ठरला. दुसरीकडे मेस्सीने अंतिम सामन्यात दोन करून फुटबॉल जगतात इतिहास रचला. (Argentina vs France)

फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या मेस्सीने मोठे विक्रम आपल्या नावावर केले. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 26 सामने खेळणारा तो खेळाडू बनला आहे. रविवारी रात्री फ्रान्सविरुद्धच्या महामुकाबल्यात मेस्सीने हा पराक्रम केला. त्याने 25 सामने खेळलेल्या माजी जर्मन दिग्गज लोथर मॅथॉसला मागे टाकले आहे. तिसऱ्या क्रमांकावर जर्मनीचा मिरोस्लाव क्लोस आहे, ज्याने फिफा विश्वचषक स्पर्धेत जर्मनीकडून 24 सामने खेळले. इटलीच्या पाउलो मालदीनीने विश्वचषकातील 23 सामन्यांमध्ये भाग घेतला होता.

याचबरोबर फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात गोल करताच त्याने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. तो विश्वचषकाच्या साखळी, राऊंड ऑफ 16, क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनलमध्ये गोल करणारा विश्वचषक इतिहासातील पहिला खेळाडू बनला. तसेच मेस्सीच्या नावावर आता 12 विश्वचषक गोलची नोंद झाली असून त्याने ब्राझीलचे माजी दिग्गज खेळाडू पेले (12) यांच्याशी बरोबरी केली आहे.

मेस्सीची जादू आणि अचूक पासने अर्जेंटिनाला दुहेरी यश

35 वर्षीय मेस्सी शेवटचा विश्वचषक खेळत आहे. त्याच्या ड्रिब्लिंगचे सर्वांनाच वेड आहे. चेंडूवर नियंत्रण ठेवून तो विरोधी संघाला फसवतो. अंतिम सामन्यातही त्याची ही जादू पहायला मिळाली. अर्जेंटिनाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमण हाच बचाव ही रणनिती वापरून फ्रान्सच्या गोलपोस्ट धडका मारल्या. मेस्सीने अनेकवेळा फ्रेंच खेळाडूंना चकवा देत आपल्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंना अचूक पास दिले. पण, सामन्याच्या 20 मिनिटांपर्यंत त्यांच्या आक्रमणाला यश आले नाही. पण 21 व्या मिनिटाला केलेल्या एका चढाईदरम्यान, फ्रान्सच्या उस्माने डेम्बेलेने पेनल्टी बॉक्समध्ये अर्जेंटिनाच्या एंजल डी मारियाला चूकीच्या पद्धतीने पाडले. ही चूक पाहून रेफ्रींनी अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली. मेस्सीने या संधीचे सोने करत फ्रेंच गोलरक्षका चकवत डाव्या कोप-यात चेंडू पाठवला. त्याने 23 व्या मिनिटाला गोल केला. याबरोबरच स्टेडियमध्ये एकच जल्लोष झाला. मेस्सीचा हा यंदाच्या विश्वचषकातील सहावा गोल असून तो या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे.

1-0 असी आघाडी मिळाल्यानंतर अर्जेंटिनाने आपल्या आक्रमणाला आणखीन धार आणली. चेंडूवरचा ताबा सुटू न देता त्यांनी फ्रांन्सवर दबाव टाकला. त्यामुळे फेंच खेळाडू हतबल होताना दिसले. याचाच फायदा उठवत 36 व्या मिनिटाला मेस्सीने फ्रेंच मिडफिल्डरला फसवून मॅकअलिस्टरकडे चेंडू पास केला. पुढे मॅकअलिस्टरने डी मारियाकडे चेंडू पास केला आणि डी मारियाने कोणतीही चूक न करता चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवला. या गोलमध्ये मेस्सीच्या सुरुवातीचा पास खूप महत्त्वाचा ठरला. एकप्रकारे त्याने टाकलेल्या ठिणगीचा पुढे जाऊन वणवा झाला आणि अर्जेंटिनाने पहिल्याच हाफमध्ये डबल धमाका करून 2-0 अशी अघाडी मिळवली.

दुस-या हाफमध्ये फ्रेंच खेळाडू चार्ज होऊन मैदानात उतरले. अर्जेटिनाचे दोन गोल फेडण्याच्या इराद्याने त्यांनी एकापाठोपाठ एक चढाया सुरू केल्या. त्यामुळे अर्जेंटिना बॅकफुटवर जात असल्याचे दिसले. याच संधीचा फायदा उठवत फ्रान्सने 80 व्या मिनिटाला जोरदार आक्रमण केले. याचा बचाव करताना अर्जेटिनाच्या खेळाडूने फ्रेंच खेळाडूला चुकीच्या पद्धतीने पाडल्याने रेफरींनी फ्रान्सला पेनल्टी दिली. याचा फायदा स्टार खेळाडू कायलियन एमबाप्पेने घेतला. गोलरक्षक मार्टिनेझ पूर्णपणे तयार होता, पण एम्बाप्पेचा फटका तो रोखू शकला नाही. अशाप्रकारे फ्रान्सने पहिला गोल नोंदवून सामन्यात पुनरागमन केले. यानंतर अवघ्या 100 सेकंदांमध्ये 82 व्या मिनिटाला एम्बाप्पेने आपला दमदार खेळ दाखवला आणि सामन्यातील दुसरा गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला. एमबाप्पेच्या या गोलला मार्कस थुरामने असिस्ट केले. याचबरोबर एम्बाप्पेचे या विश्वचषकात आतापर्यंत 7 सामन्यांत 7 गोल झाले. याशिवाय दोन गोलमध्ये असिस्ट करून तो गोल्डन बूटच्या शर्यतीत मेस्सीच्या पुढे गेला.

निर्धारित आणि दुखापतीच्या वेळेनंतरही फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे सामन्याचा निकाल अतिरिक्त वेळेत गेला. निर्धारित आणि दुखापतीच्या वेळेनंतरही फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे सामन्याचा निकाल अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेच्या दुस-या हाफमध्ये अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने शानदार गोल केला. त्याने 108 व्या मिनिटाला चेंडू फ्रान्सचे गोलजाळे भेदले. या गोलमुळे अर्जेंटिनाचा संघ सामन्यात 3-2 असा पुढे गेला. त्यानंतर पुन्हा एकदा फ्रान्सने 118 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत बरोबरी साधली. कायलियन एम्बाप्पेने हॅट्रीक केली. अखेर अतिरिक्त वेळेतही सामना बरोबरीत सुटल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. यात

स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारे खेळाडू

1. किलियन एमबाप्पे (फ्रान्स)- 8 गोल
2. लियोनेल मेस्सी (अर्जेंटीना)- 7 गोल
3. ओलिवर गिरुड (फ्रान्स)- 4 गोल
4. जूलियन अल्वारेज (अर्जेंटीना)- 4 गोल

मेस्सी-डी मारिया यांच्या नावावर विक्रम

यानंतर 36 व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझच्या पासवर अँजेल डी मारियाने अर्जेंटिनाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मेस्सी आणि डी मारिया यांनी सुरुवातीचे दोन गोल केले. दोघांचे वय 34 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. कोणत्याही एका सामन्यात हे 1930 ते 2018 या कालावधीत 34 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी अंतिम फेरीत केलेल्या गोलइतके आहे. 1930 ते 2018 पर्यंत, केवळ दोनच खेळाडू होते ज्यांनी 34+ वयाच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एक गोल केला. यामध्ये लेधोम आणि झिनेदिन झिदान यांचा समावेश होता.

विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनचा निर्णय पेनल्टी शूटआऊटद्वारे झाला. 1994 मध्ये ब्राझीलने इटलीचा पराभव केला होता, तर 2006 मध्ये इटलीने फ्रान्सवर मात करत विश्वचषक उंचावला होता.

हेही वाचा;

Back to top button