Argentina-France fans : फ्रान्‍स-अर्जेंटिना सामन्‍यानंतर केरळमध्‍ये हिंसाचार

विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यानंतर जल्‍लोष करताना अर्जेंटिनाचे समर्थक.
विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यानंतर जल्‍लोष करताना अर्जेंटिनाचे समर्थक.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेत फ्रान्‍स आणि अर्जेंटिना संघांमध्‍ये रविवारी ( दि. १८) अंतिम सामना झाला. जगभरातील कोट्यवधी फुटबॉल चाहत्‍यांनी एका अविस्‍मरणीय सामन्‍याचा थरार अनुभवला. ( Argentina-France fans ) अखेर अर्जेंटिना संघाने सामना जिंकत विश्‍वचषकावर आपलं नाव कोरलं. केरळ राज्‍यातही अर्जेंटिनाच्‍या विजयाचा मोठ्या प्रमाणवर जल्‍लोष झाला. यावेळी काही ठिकाणी हिंसाचार झाला असून, यामध्‍ये तीन तरुण जखमी झाले.

केरळमध्‍येही अर्जेंटिनाच्‍या विजयानंतर राज्‍यभरात चाहत्‍यांनी एकच जल्‍लोष केला. राज्‍यातील कन्‍नूरमधील पल्‍लियामूल नजीक फ्रान्‍स आणि अर्जेटिंना समर्थक एकमेकांना भिडले. यावेळी तिघांवर चाकू हल्‍ला करण्‍यात आला असून, एका जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्‍यात घेण्‍यात आल्‍याचे स्‍थानिक पोलिसांनी सांगितले.

राज्‍यातील कोची आणि तिरुवअनंतपूरम शहरांमध्‍येही सामन्‍यानंतर हिंसाचाराच्‍या घटना घडल्‍या. येथे अर्जेंटिनाच्‍या विजयानंतर जल्‍लोष करताना एका जमावाने दोन पोलीस अधिकार्‍यांवरच हल्‍ला केला. कोचीमध्‍ये गर्दीला पांगविण्‍याचा प्रयत्‍न करणार्‍या एका पोलीस अधिकार्‍याला जमावाने मारहाण करत आली.

 Argentina-France fans : जल्‍लोषावेळी एका युवकाचा मृत्‍यू

विजयानंतर कोल्‍लम शहरातील स्‍टेडियममध्‍ये अर्जेंटिना संघाच्‍या समर्थकांनी जल्‍लोष केला. यावेळी १७ वर्षीय युवकाचा मृत्‍यू झाला. अक्षय कुमार असे त्‍याचे नाव असल्‍याचे स्‍थानिक पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news