Arbaaz Khan : ५६ वर्षांचा अरबाज पुन्हा बोहल्यावर चढणार, शौरा खानशी यादिवशी लग्न?

 giorgia andriani Arbaaz Khan malaika arora
giorgia andriani Arbaaz Khan malaika arora
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : खान परिवारात लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. अरबाज खान पुन्हा एकदा बोहल्यावर चढायला तयार आहे. आधी मलायका सोबत घटस्फोट, जॉर्जिया एंड्रियानीसोबत नुकताच ब्रेकअप झालाय. (Arbaaz Khan) आता वयाच्या ५६ व्या वर्षी अरबाजला पुन्हा एकदा प्रेम मिळालं आहे. रिपोर्टनुसार, अरबाज खान २४ डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड आणि मेकअप आर्टिस्ट शौरा खान सोबत निकाह करणार आहे. लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. अरबाज खानचा ६ वर्षांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोराशी घटस्फोट झाला होता. (Arbaaz Khan)

संबंधित बातम्या –

कोण आहे शौरा खान?

अरबाजच्या लग्नाचे वृत्त ऐकून फॅन्स सुपर एक्सायटेड आहेत. प्रत्येकाला उत्सुकता आहे की अरबाज होणारी पत्नी कोण आहे? अरबाजच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे -शौरा खान. शौरा एक प्रोफेशनल सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. ती इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या सेलेब्ससोबत काम करते. शौरा रवीना टंडन आणि तिची मुलगी राशाचीदेखील मेकअप आर्टिस्ट आहे.

कशी झाली पहिली भेट?

अरबाज – शौराची पहिली भेट अरबाजचा आगामी चित्रपट 'पटना शुक्ला'च्या सेटवर झाली होती.

कधी होणार लग्न?

वेडिंग वेन्यू कोठे असेल, हे अद्याप समजलेले नाही. हे लग्न एक खासगी असेल, ज्यामध्ये फक्त कुटुंबतील मंडळी ,हभागी होतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news