HBD Govinda : पानटपरीवर चमकलं भाग्य, चाळीत राहिलेला गोविंदा आज कोट्याधीश

HBD Govinda
HBD Govinda
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार गोविंदा आज २१ डिसेंबर आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. एक वेळ अशी होती की, त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो आपल्या मामाच्या घरी राहत होता. पण, त्याचे भाग्य चमकले ते एका पानटपरीवर. (HBD Govinda) पानटपरीवर उभारलेल्या गोविंदावर बीआरचोप्रा कॅम्पच्या मॅनेजरची नजर पडली आणि त्याला पहिला चित्रपट मिळाला. तेथून त्याच्या करिअरची गाडी धावू लागली. (HBD Govinda)

संबंधित बातम्या –

आपल्या तीन दशकाच्या करिअरमध्ये अभिनेता गोविंदाने कोटींची कमाई केली. मुंबईतील जुहूमध्ये तो एका आलिशान घरात राहतो. त्याची एकूण संपत्ती १७० कोटींच्या आसपास सांगितली जाते. रिपोर्टनुसार, गोविंदाचा हा बंगला १६ कोटी रुपयांचा असून तो पत्नी सुनीता आणि आपल्या मुलांसोबत राहतो. गोवींदाचे घर आतून खूप सुंदर आहे. मार्बल फरशीसोबत लिव्हिंग रुमचा प्रत्येक कोपरा सजवण्यात आलं आहे. तसेच इतर खोल्यांना क्लासी लूक देण्यासाठी वुडन वर्क करण्यात आला आहे. घराची बाल्कनी ते गार्डन पर्यंत संपूर्ण एरिया हिरवागार आहे. याचे काही फोटोज गोविंदाने दिवाळीच्या निमित्ताने फॅन्ससाठी शेअर केले होते. गोविंदाचे घर डुप्लेक्स आहे. हॉल एरियमध्ये सोफा असून त्यावर शक्ती कपूरसोबत बसून त्याने फोटो शेअर केले होते.

गोविंदाचा डायनिंग एरियादेखील खूप लॅविश आहे. क्लासी फर्निचरसोबत भिंतींवर सुंदर फोटो फ्रेम्स लावण्यात आले आहेत. घराच्या टेरेसवर छोटे मार्बल चिप्सचे फ्लोरिंग करण्यात आले आहेत. या टेरेसवरून समुद्र आणि मुंबईचा सुंदर नजारा दिसतो.

कुटुंबासमवेत साजरा केला वाढदिवस

गोविंदाने आपल्या कुटुंबासमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी तो ब्लॅक कलर आऊटफिटमध्ये दिसला.

video-Viral Bhayani x वरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news