Dunki Movie Review : शाहरूखच्या ‘डंकी’वर कॉमेन्ट्सचा पाऊस; थिएटर बाहेर चाहत्यांचा धुरळा | पुढारी

Dunki Movie Review : शाहरूखच्या 'डंकी'वर कॉमेन्ट्सचा पाऊस; थिएटर बाहेर चाहत्यांचा धुरळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शाहरुख खानचे बॅक टू बॅक ‘जवान’, ‘पठाण’ आणि आता ‘ डंकी’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. ‘जवान’, ‘पठाण’ ने तुफान कमाई केली आहे. तर सध्या ‘डंकी’ ची क्रेझ चाहत्यांच्यात पाहायला मिळत आहे. शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपट आज म्हणजे, २१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी चाहत्यांच्या भेटीस आलाय. थिएटरमध्ये चित्रपट रिलीज होताच किंग खानच्या चाहत्यांनी फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी देशभरातील हजारोच्या संख्येने चाहते येथे उपस्थित होते. तर दुसरीकडे चित्रपट पाहून येणाऱ्यांनी शाहरूखच्या अभिनयाचे भरभरून कौतुक करताना सोशल मीडियावर कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. ( Dunki Movie Review)

संबंधित बातम्या  

मुंबईच्या आयकॉनिक सिंगल स्क्रीन थिएटर गेटी गॅलेक्सीमध्ये ‘डंकी’ चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा फर्स्ट शो आज गुरूवारी सकाळी ५.५५ वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी किंग खानचे चाहते ढोल-ताश्यासोबत फटाक्यांची आतषबाजी करत चित्रपटाच्या रिलीजचा आनंद साजरा केला. चित्रपटगृहाबाहेरील हा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या चित्रपटात शाहरूखसोबत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, विक्की कौशल, अनिल ग्रोवर, विक्रम कोचर, बोमन इरानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे. चित्रपटाने ओपनिंग डेच्या आधीच १० कोटी रूपयांची भरघोस अशी कमाई केली होती. शाहरूखच्या ‘डंकी’ साऊथ स्टार प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाला टक्कर देणार आहे. ‘सालार’ चित्रपट उद्या म्हणजे, २२ डिसेंबjला रिलीज होणार आहे.

दरम्यान एका युजर्सने डंकी चित्रपटाचे कौतुक करताना लिहिले की, ‘अभिनेता शाहरूख खानसोबत राजकुमार हिरानीने हे पुन्हा करून दाखविले आहे’. ‘चित्रपटाची पटकथा, अभिनय उत्कृष्ट आहे आणि हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील रत्नांमध्ये नेहमीच गणला जाईल’. ‘दिग्दर्शनाच्या दृष्टीकोनातून राजकुमार हिरानी पेक्षा चांगले कोणी करू शकत नाही’. न्यूझीलंडमधील एका युजर्सने लिहिले की, राजकुमार हिरानी यांचे कथाकथन कौशल्य, ऐतिहासिक अचूकतेच्या समर्पणासह ‘डंकी’ला एका काळातीत उत्कृष्ट नमुना बनविते. आतापर्यंत बनवलेल्या महान चित्रपटांमध्ये त्याचे स्थान वेगळे आहे. हा किंग खानचा सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे सांगितले. ( Dunki Movie Review)

Back to top button