HBD Sunny Leone : सनीच्या वाढदिवसाचा काय आहे खास प्लॅन?

sunny leone
sunny leone
Published on
Updated on

पुढारी आऑनलाईन डेस्क : सनी लिओनीचा आज १३ मे रोजी वाढदिवस आहे. (HBD Sunny Leone) ती कान्सपूर्वी, जवळचे मित्र आणि कुटुंबासह वाढदिवस साजरा करणार आहे. अभिनेत्री सनी लिओनी तिचा केनेडी चित्रपट सादर करण्यासाठी कान्सला जाण्यापूर्वी नॉन-स्टॉप काम करत आहे. तिच्याकडे नव्या प्रोजेक्ट सोबत २०२३ मध्ये अनेक नव्या गोष्टी आहेत. अभिनेत्रीच्या जवळच्या एका स्रोताने ती तिचा वाढदिवस कसा साजरा करणार आहे, याविषयी माहिती दिली. (HBD Sunny Leone )

अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, "यावर्षी सनीने तिच्या जवळच्या मित्रांसह, कुटुंबासोबत काही हा खास दिवस साजरा करणार आहे. कान्सची तयारी सुरू होण्यापूर्वी सनी आवश्यक असलेली सर्व तयारी करण्यात आणि स्वतःचा वेळ घालवत आहे."

दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तिच्या इतर कलाकारांसोबत सनी कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार आहे. कान्स 2023 मध्ये केनेडी प्रीमियर १६ मे होणार आहे. 'मिडनाईट' स्क्रिनिंगसाठी ज्युरींनी निवडलेला हा एकमेव भारतीय चित्रपट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news