पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलांच्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने त्यांची घरातील लूडबूड वाढली आहे. लहान मुले सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसांतून अनेक वेळा काहीतरी खायला मागत असतात. यावेळी त्यांना दुधासोबत केळ, सफरचंद, काजू, पपई, द्राक्षे यासारखी फळे खायला दिली जातात. मात्र, काही मुलांना ही फळे अजिबात आवडत नाहीत. तर काही मुलांना निवडक फळे आवडतात. अशावेळी मुलांना पौष्टिक पदार्थ खावू घालण्याची गरज असते. सारखे- सारखे दूध आणि फळे दिली तर मुले ती खाण्याचा कंटाळा करतात. यामुळे अनेक घरातील काही फळे खराब होऊन जातात. मग अशावेळी दूध आणि वेगवेगळ्या फळांपासून मिक्स फ्रूट मिल्क शेक बनवून मुलांना दिला तर ते आवडीने त्याचे सेवन करतात. यासाठी जाणून घेऊयात ते कसे बनवायचे.( Mix Fruits Milk shake )
केळ- २
सफरचंद- १
चिंकू- २- ३
पपई- २ कप
द्राक्षे- २ कप
दूध- अर्धा लिटर
साखर- ४-५ चमचे
वेलची पावडर- अर्धा चमचे
बर्फाचे तुकडे- ५-६
ड्राय फ्रूट (काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पिस्ता, चारोळ्या, खारीक, खजूर, मनुका) – ३-४
१. पहिल्यांदा मिल्क शेकसाठी ड्राय फ्रूट (काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पिस्ता, चारोळ्या, खारीक, खजूर, मनुका) समप्रमाणात घेऊन २ ते ३ तास भिजत ठेवावे.
२. दोन केळ्याच्या साली काढून त्याचे छोटे-छोटे तुकडे करावेत.
३. सफरचंद, चिंकू, पपई ही फळेही स्वच्छ पाण्याने धुवून त्याचेही बारीक-बारीक तुकडे करून घ्यावेत.
४. एका मिक्सरच्या भांड्यात बारिीक केलेली सर्व फळे आणि दोन कप द्राक्षे एकत्रित मिक्स करावे
५. यानंतर त्यात थोडे दूध आणि दोन चमचा साखर घालून त्याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट एका भांड्यात काढून घ्यावी.
६. जर मिक्स शेकमध्ये ड्राय फ्रूट घालायचे असल्यास भिजत ठेवलेले ड्राय फ्रूटमधून पाणी गाळून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालावे.
७. या मिश्रणात शिल्लक राहिलेले दूध, अर्धा चमचा वेलची पावडर, २ चमचा साखर घालून बारिीक करावे.
८. दोन्ही तयार केलेली पेस्ट एकत्रित करून चांगली मिक्स करावी.
९. एका काचेच्या किंवा कोणत्याही ग्लासमध्ये २-३ बर्फाचे तुकडे घालून त्यात हे मिश्रण ओतावे.
१०. लहान मुलांसाठी मिक्स फ्रूट मिल्क शेक तयार होईल. ( Mix Fruits Milk shake )
मुलांना हा शेक नक्की आवडेल. शिवाय सर्व फळे असल्यामुळे मुले शेक पिण्यास नकार देणार नाहीत.
हेही वाचा :