Meenakshi Rathod : सुख नक्की काय असतं फेम देवकीची कन्या ‘यारा’ झाली १ वर्षाची | पुढारी

Meenakshi Rathod : सुख नक्की काय असतं फेम देवकीची कन्या 'यारा' झाली १ वर्षाची

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) हिची कन्या यारा एक वर्षाची झाली आहे. तिचा पहिला वाढदिवस मोठ्या धामधुमीत साजरा करण्यात आला. यावेळी मीनात्री आणि तिचा पती अभिनेता कैलास वाघमारे यांनी निमंत्रित केलेल्या मराठी कलाकारांनी या सेलिब्रेशनला हजेरी लावली. या वाढदिवसाला गिरीजा प्रभू, माधवी निमकर यासारख्या कलाकारांची मांदियाळी होती. मीनाक्षी राठोडने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत देवकीची भूमिका (Minakshi Rathod) साकारली होती.

मीनाक्षी राठोडने याराचा फोटो अपलोड करत खास नोट लिहिलीय. तिने पोस्टमध्ये म्हटलंय-HAPPY ONE
MY LITTLE ONE ❤️ खरतर वाढदिवशी असं social media वर शुभेच्छा देणं खूप typical आहे. पण काय करणार आपला आनंद सगळ्यांसोबत share करण्याची हीच एक सोयीस्कर जागा आहे. तर आज यारा आणि आमच्या सोबतीला एक वर्ष पूर्ण झालं! आम्हाला समृद्ध करणारा हा प्रवास तुझ्या रूपानं बहरत जावा! ❤️

मीनाक्षी मुळची जालन्याची आहे. तिला बालपणापासून अभिनयाची आवड आहे. तिच्या अभिनयाची सुरूवात शाळेपासून झाली. तिच्या वडिलांनाही अभिनयाची आवड आहे. त्यामुळे त्यांनी देवकीला अभिनय, नृत्य, नाटक स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meenakshi Rathod (@meenakshirathod17)

जालन्यातील गंगाराम वाडी, अंबड येथील शाळेतून तिने शिक्षण घेतले. करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली. थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ येथून तिने पुढील शिक्षण घेतले. तिला ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकात सावित्रीबाई यांची भूमिका मिळाली. तिने मयत, कमरबंद, सायकल यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meenakshi Rathod (@meenakshirathod17)

तिने २०१८ मध्ये मराठी मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलं मधून टीव्ही विश्वात पदार्पण केले. २०२० मध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका मिळाली. यामध्ये तिची देवकी उदय शिर्के पाटील ही व्यक्तीरेखा होती.

Back to top button