अपारशक्ती खुराना IFFM मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठी नामांकन

अपारशक्ती खुराना
अपारशक्ती खुराना
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता अपारशक्ती खुराना हा एक प्रतिभावान कलाकार मानला जातो. अॅमेझॉन प्राईमची वेब सीरीज ज्युबिलीमधील मदन कुमार यांच्या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. मेलबर्नच्या प्रसिद्ध भारतीय चित्रपट महोत्सवात (IFFM) सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) मालिका श्रेणीतील नामांकन या अभिनेत्याला मिळाल आहे.

IFFM मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) मालिकेसाठी त्याचे नामांकन त्याच्या चाहत्यांसाठी अनोखी बाब आहे. १९४० च्या दशकातील स्टार मदन कुमार यांच्या भूमिकेचे चाहत्यांनी आणि समीक्षकांनी खूप कौतुक केले होते. भारतीय मनोरंजन उद्योगातील काही सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये त्याला नामांकन मिळाले आहे. या श्रेणीमध्ये अभिषेक बच्चन, विजय सेतुपती, शाहिद कपूर, त्यांचे सहकलाकार प्रोसेनजीत चॅटर्जी आणि सिद्धांत गुप्ता आणि विजय वर्मा यांसारखे कुशल अभिनेते आहेत.

स्त्री-२ ची चर्चा सुरू असताना या अभिनेत्याकडे बर्लिन हा चित्रपट देखील आहे. ज्युबिलीचे लेखक अतुल सबरवाल यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केले आहे आणि अॅप्लाज एंटरटेनमेंट सोबत 'फायंडिंग राम' नावाचा डॉक्युमेंट्री त्यांच्या किटीमध्ये आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news