पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीवर '३६ गुणी जोडी' या नवीन मालिकेचा प्रोमो झळकला आणि चर्चा होऊ लागली ती मालिकेच्या विषयाबद्दल कारण या मालिकेची टॅग लाईनच आहे. 'प्रत्येक जोडी जुळत नसते'. या मालिकेतील नायक नायिका विरुद्ध दृष्टिकोण असलेल्या दोन व्यक्ती आहेत. वेदांत हा एक सुप्रसिद्ध तरुण, प्रस्थापित उद्योगपती आहे, तो स्त्रीपेक्षा पुरुषांच्या सहवासाला प्राधान्य देतो.
कारण त्याचा असा विश्वास आहे की पुरुष स्त्रीपेक्षा अधिक सक्रिय, कार्यक्षम, तीक्ष्ण आणि मेहनती आहे. तर अमुल्याला डॉक्टर बनण्याची इच्छा असली तरी तिला हिमोफोबिया आहे. ती प्रेमळ, स्वैच्छिक, टॅलेंटेड आणि विनोदी असून ही तिच्या व्यक्तिमत्त्वाची मजबूत बाजू आहे. शशांक सोळंकी यांची निर्मिती असलेल्या या मालिकेचं लेखन अनिल देशमुख यांनी केलं असून दिग्दर्शन हरीश शिर्के यांचं आहे.
या मालिकेच्या निमित्ताने अनुष्का सरकटे आणि आयुष संजीव ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनुष्का 'कारभारी लयभारी' या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली होती.