पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्टर लावणाऱ्यांना दणका; ६ अटकेत, १०० जणांवर गुन्हा

पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्टर लावणाऱ्यांना दणका; ६ अटकेत, १०० जणांवर गुन्हा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टर लावल्याप्रकरणी सहा जणांना अटक  करण्‍यात आली आहे. १०० जणांवर गुन्हा  दाखल झाला आहे, अशी माहिती दिल्‍लीतील विशेष पोलीस आयुक्‍त दीपेंद्र पाठक यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (Objectionable poster )

Objectionable poster : ६ अटक, १०० जणांवर गुन्हा

दिल्ली पोलिसांच्य माहितीनुसार, दिल्लीतील काही भागात भिंती आणि खांबांवर पंतप्रधान मोदी यांचा अवमान करणारी पोस्‍टर लावण्‍यात आली होती. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अशी पोस्‍टर छापणार्‍या दोन प्रिंटिंग प्रेस मालकांचाही यामध्‍ये समावेश आहे. तर  १०० जणांवर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. प्रिंटिंग प्रेस कायदा आणि मालमत्ता गैरव्यवहार कायद्याच्या कलमांतर्गत संशयित आरोपींवर गुर्नंहा दाखल करण्‍यात आला आहे. आम आदमी कार्यालयातून निघालेल्या एका व्हॅनला अडवण्यात आलं. या व्हॅनमध्ये काही पोस्टर आढळली आहेत. व्हॅन अडवल्यानंतर किमान २,००० पोस्टर्स काढून टाकण्यात आले आणि आणखी २,००० जप्त करण्यात आल्‍याचेही विशेष पोलीस आयुक्‍त दीपेंद्र पाठक यांनी सांगितले.

पोस्टरवर छापखान्याची नावे न छापल्याने मालकांना अटक करण्यात आली आहे. ऑर्डर कोठून मिळाली याचा आम्ही तपास करत आहोत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

'आप'कडून  कोणतीही प्रतिक्रिया नाही

आम आदमी कार्यालयातून निघालेल्या एका व्हॅनला अडवण्यात आलं. या व्हॅनमध्ये मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टर आढळली आहेत. याप्रकरणी आपच्या नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news