Anti cancer : ‘या’ भाज्या आहेत कर्करोगरोधक

 Anti cancer
Anti cancer

जगभरात अनेक प्रकारच्या कर्करोगाने मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होत असतो. हा जीवघेणा आजार दूर ठेवण्यासाठी आहारात काही भाज्यांचा समावेश करणे हितावह ठरते. अशाच काही कर्करोगरोधक ( Anti cancer ) भाज्यांची ही माहिती…

अळूचे कंद : 'एनआयएच'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार अळूचे कंद किंवा गड्डे (हिंदीत 'अरबी') कर्करोगाचा धोका करण्यासाठी गुणकारी असते. या भाजीत पॉलीफेनॉलचे प्रमाण चांगले असते. ते कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. शिवाय ही भाजी ट्यूमर वाढवणार्‍या पेशी कमी करण्यासाठीही मदत करू शकते.

टोमॅटो : 'एनसीबीआय'च्या एका संशोधनानुसार टोमॅटोही कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी गुणकारी आहे. लाल टोमॅटोमध्ये 'लाइकोपिन' आढळते जे कॅरोटीनॉईड आहे. हे संयुग कर्करोगाविरुद्ध प्रतिबंधक गुणधर्म दर्शवते. लाइकोपिनमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्मही असतात. त्यामुळे कर्करोगाच्या वाढीला आळा घालण्यास व सुरुवातीलाच रोखण्यास मदत होते.

पालक : या हिरव्यागार भाजीत कर्करोगरोधक गुण मोठ्या प्रमाणात आहे. पालकमध्ये बीटा-कॅरोटिन व 'क' जीवनसत्त्व भरपूर असते. हे दोन्ही पोषक घटक कर्करोगाच्या पेशी विकसित होण्यापासून बचाव करतात. याशिवाय ही भाजी 'अँटी-ऑक्सिडंट'प्रमाणेच फ्री रॅडिकल्स आणि कर्करोगकारक कार्सिनोजेन्सला प्रतिबंधित करण्यास मदत करते.

ब्रोकोली : एका संशोधनानुसार कर्करोगापासून बचाव करण्यासाठी ब्रोकोली या भाजीचाही उपयोग होतो. या भाजीत कमी प्रमाणात 'सेलेनियम' असते ज्यामध्ये अँटी-कॅन्सर गुण असतात. तसेच यामध्ये ग्लुकोराफॅनिन हा पदार्थ असतो जो अँटी-कॅन्सर पदार्थ सल्फोराफेनमध्ये बदलू शकतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगांपासून बचाव करण्यास मदत होते.

दुधी भोपळा : कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी दुधी भोपळाही गुणकारी आहे. दुधीमधील केमोप्रिव्हेंटिव्ह कर्करोगाला दूर ठेवते. दुधीच्या रसाचा वापर त्वचेचा कर्करोग होऊ न देण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news