एअर इंडियाच्या विमानात आणखी एका प्रवाशाने केली महिलेच्या ब्लँकेटवर लंघुशंका | Another Peeing Incident in Air India

air india
air india
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद प्रवाशाने एका महिला सहप्रवासीवर लंघुशंका केलेल्या प्रवाशाचा शोध पोलिसांकडून सुरु असतानाच अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. ६ डिसेंबर रोजी पॅरिस ते दिल्ली जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने एका महिलेल्या ब्लँकेटवर लंघुशंका केल्याचे समोर आले आहे. त्या प्रवाशाने लेखी माफीनामा दिल्यानंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यास सोडून देण्यात आल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेला देण्यात आलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे. (Another Peeing Incident in Air India)

या घटनेनंतर विमान उतरल्यावर त्या मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. मात्र, तो प्रवासी कोणत्या क्लासने प्रवास करित होता याची माहिती मिळू शकली नाही. पॅरिस ते दिल्ली हे विमान ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी विमानतळ सिक्युरिटीला संबधित व्यक्ती विषयी कळविण्यात आले. तो प्रवाशी पुर्णपणे नशेत होता. केबीन क्रूकडून देण्यात येणाऱ्या सुचनांचे तो पालन करत नव्हता. त्यानंतर त्याने दुसऱ्या सहप्रवासी महिलेच्या ब्लँकेटवर लघुशंका केली, असे विमानतळ व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले. (Another Peeing Incident in Air India)

विमानातून उतरतातच त्या मद्यधुंद प्रवाशाला केंद्रीय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) ताब्यात घेतले. नंतर दोन प्रवाशांनी या प्रकरणी मध्यस्थी केली व परस्पर सहमतीने हा वाद मिटविण्यात आला. त्या प्रवाशाकडून लेखी माफीनामा लिहून घेऊन सुरक्षा दलाने त्याला सोडून दिले.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news