Air India : ‘लघुशंका’प्रकरणी एअर इंडियाची ‘त्या’ मद्यधुंद पुरुषावर मोठी कारवाई | पुढारी

Air India : ‘लघुशंका’प्रकरणी एअर इंडियाची ‘त्या’ मद्यधुंद पुरुषावर मोठी कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : एअर इंडियाच्या (Air India) बिझनेस क्लासमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका पुरुष प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याचे समोर आले. याप्रकरणी 70 वर्षीय महिला प्रवाशाने तक्रार केल्यानंतर एअर इंडियाने कारवाईचा बडगा उचलत संबधीत पुरुष प्रवाशांवर 30 दिवसांची बंदी घातली आहे. याची माहिती विमान वाहतूक नियामक, डीजीसीएला कळवली आहे. तसेच मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने महिलेसोबत गैरवर्तन केल्याची तक्रारही पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाचे (Air India) विमान जेएफके (अमेरिका) वरून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला होता. पुरुष प्रवाशाच्या कृत्यानंतर महिलेने केबिन क्रू मेंबर्सकडे तक्रार केली. पण त्यांनी त्या प्रवाशावर कसलीही कारवाई केली नाही. यामुळे विमान दिल्लीत उतरल्यानंतर तो पुरुष प्रवाशी बिनधास्तपणे निघून गेला. त्यानंतर महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र पाठवल्यानंतरच एअर इंडियाने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे, असे सूत्राकडून सांगण्यात आले आहे. या दरम्यान एअर इंडियानेही पोलिसात तक्रार दाखल केली.

Back to top button