Ram Temple : अयोध्यातील राम मंदिराचे १ जानेवारी २०२४ ला होणार लोकार्पण : अमित शहा | पुढारी

Ram Temple : अयोध्यातील राम मंदिराचे १ जानेवारी २०२४ ला होणार लोकार्पण : अमित शहा

दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्यात निर्माण केले जाणारे भव्य दिव्य राममंदिराचे काम पुढील वर्षात पूर्ण होऊन १ जानेवारी २०२४ रोजी लोकार्पण होईल अशी घोषणा केली. त्रिपुरा येथील सभेत बोलताना यावेळी अमित शाह म्हणाले, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मंदिराच्या निर्माणात अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. वादाचे मुद्दे उपस्थित करुन हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचवला. अखेर न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर निर्मितीच्या कामास सुरुवात केली असे अमित शाह म्हणाले.

यावेळी बोलताना अमित शाह यांनी राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाले, ‘राहुल बाब ऐका, १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचे काम पुर्ण होऊन ते लोकांसाठी खुले केले जाईल. 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि राम मंदिराचे उद्घाटन सत्ताधारी भाजपसाठी ट्रमकार्ड ठरु शकेल अशी अपेक्षा आहे.

अमित शाह म्हणाले की 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होतो. त्यावेळी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे मंदिर तिथेच बांधणार, पण तारीख नाही सांगणार.. तर राहुलबाबा, कान देऊन ऐका, १ जानेवारी २०२४ ला अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर तयार होईल. फक्त राम मंदिरच नाही तर एक-दोन वर्ष जाऊ द्या, आई त्रिपुर सुंदरीचं मंदिरही एवढं भव्य बनवलं जाईल, की संपूर्ण जग ते पाहण्यासाठी इकडे येईल.

अधिक वाचा :

Back to top button