Asian Para Games 2023 : १५०० मीटर धावण्‍याच्‍या स्‍पर्धेत अंकुर धामाने पटकावले सुवर्ण पदक

Asian Para Games 2023 : १५०० मीटर धावण्‍याच्‍या स्‍पर्धेत अंकुर धामाने पटकावले सुवर्ण पदक

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंकुर धामाने आशियाई पॅरा गेम्स २०२३ मध्ये पुरुषांच्या १५०० मीटर T11 मध्ये भारतासाठी आज सुवर्णपदक मिळवले. ४:२७.७० वेळेत त्याने ही सुवर्ण धाव घेतली आहे. यापूर्वी, अंकुरने पुरुषांच्या ५००० मीटर T11 स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.  दरम्यान, राकेश कुमार, सूरज सिंग यांनी पुरुष दुहेरी कंपाउंड ओपन सांघिक तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. (Asian Para Games 2023)

संबंधित बातम्या : 

आशियाई पॅरा गेम्समध्ये आज तिसऱ्या दिवशी बॅडमिंटन स्पर्धेत वैष्णवी पुणेयानी आणि मानसी जोशीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. त्यांना महिला एकेरीच्या SL3 स्पर्धेत उपांत्य फेरी गाठता आली नाही. मानसी इंडोनेशियाच्या स्याकुरोह कोनिताहकडून १०-२१,१४-२१ ने पराभूत झाली. शीतल देवी आणि सरिता अधना यांनाही महिला दुहेरी कंपाउंड सांघिक तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक मिळाले. अखेरच्या सुवर्ण सामन्यात चीनच्या लिन/झांग यांच्याकडून १५०-१५२ असा पराभव झाला. पूजाने महिलांच्या F54/F55 डिस्कस थ्रो इव्हेंटमध्ये रौप्य पदक जिंकले. (Asian Para Games 2023)

या स्पर्धेत टेबल टेनिस वर्ग १ पुरुष एकेरीमध्ये संदीप डांगीने ४ पैकी २ सामने जिंकून कांस्यपदक मिळवले. तर भारताच्या हॅनीने पुरुषांच्या भालाफेक F37 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने ५५.९७ मीटर थ्रो फेकून सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताने बॅडमिंटन मिश्र दुहेरी SL3-SU5 मध्येही आणखी एक पदक पटकावले. नितेश कुमार आणि तुलसीमाथी मुरुगेसन यांनी कांस्यपदक जिंकले. भारताच्या श्रेयांश त्रिवेदीने पुरुषांच्या २०० मीटर टी -३७ धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. २५.२६ सेकंदात त्याने ही कामगिरी केली. पुरुषांच्या २०० मीटर टी ३५ धावण्याच्या स्पर्धेत नारायण ठाकुरने २९.८३ सेकंद नोंदवत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. याच स्पर्धेत रवी कुमार ३१.२८ सेकंदांसह पाचव्या स्थानावर राहिला.

आशियाई पॅरा गेम्समध्‍ये (Asian Para Games 2023) तिसऱ्या दिवशी भारताने टेबल टेनिसमध्येही खाते उघडले. टेबल टेनिस महिला एकेरी – वर्ग ४ क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवले. भालाफेकमध्ये भारताच्या सुमित अंतिलने इतिहास रचला. पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुमितने ७३.२९ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले, तर पुष्पेंद्र सिंगने ६२.०६ मीटरच्या थ्रोसह कांस्यपदकावर नाव कोरले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news