Ankita Lokhande pregnant: अंकिता होणार आई? राखी सावंत म्हणाली…

ankita-vicky
ankita-vicky

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande pregnant) 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळवली. तिने साकारलेल्या 'अर्चना' या व्यक्तिरेखेने तिला अमाप प्रसिद्धी मिळाली. अंकिताने बिझनेसमॅन विकी जैनशी विवाह केला आहे. आता ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे. तिच्या घरात पाळणा हलणार असल्याने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. आता अभिनेत्री राखी सावंतने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. एका मुलाखतीत राखी सावंतने सांगितले की, अंकिता लोखंडे आणि विकी जैन त्यांच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहेत. (Ankita Lokhande pregnant)

राखीने प्रेग्नेंसीची पुष्टी केली

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राखी सावंतला अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसीवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. राखी सावंत म्हणाली की, मला आशा आहे की, अंकिता लोखंडे लवकरच या गुड न्यूजची पुष्टी करेल. राखी सावंतने अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसीला दुजोरा दिला आहे. आशा आहे की अंकिता स्वतः लवकरच तिच्या प्रेग्नेंसीची बातमी मीडियाला सांगेल.

लग्नाला सहा महिने पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन नुकताच अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी केले. अंकिताने सेलिब्रेशनदरम्यानचे बरेच फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "आम्ही दोघेही सहा महिने एकत्र आहोत. हे खास बनवल्याबद्दल कुटुंबाचे आभार. तुम्हा सर्वांचे प्रेम. सगळ्यात जास्त धन्यवाद माझ्या प्रिय बहिणी-सासरे. ज्यांनी ते संस्मरणीय बनवले. मला आधीच सगळ्यांची आठवण येत आहे. लवकर परत या. रिया आणि विआन, मावशी तुम्हाला खूप मिस करत आहेत. तुम्हा दोघांना खूप प्रेम."

ankita lokhande-vicky jain
ankita lokhande-vicky jain

'स्मार्ट जोडी' या रिॲलिटी शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन सहभागी झाले होते. दोघांनी शोची ट्रॉफी जिंकली आणि २५ लाखांचे बक्षीसही जिंकले. दोघांनीही कुटुंब आणि मित्रांसोबत हा विजय साजरा केला. हा रिॲलिटी शो जिंकल्याचा जल्लोष अंकिता लोखंडेच्या घरी गेले अनेक दिवस सुरू होता. अंकिता लोखंडे आणि विकी जैन या दोघांनीही या काळात अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले जे खूप व्हायरलही झाले होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news